मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारताला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर विराट कोहली कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला. विराटने अचनक बीसीसीआयला हा धक्का दिल्यानंतर रोहित शर्मा कसोटी कर्णधार बनला. रोहित सध्या तिन्ही क्रिकेट प्रकारांमध्ये भारताचे कर्णधारपद सांभाळत आहे. पण रविचंद्रन अश्विनची कसोटी कर्णधारदाची इच्छा अपूर्ण राहिल्याचे दिसत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अश्विन याविषयी बोलला.
विराट कोहली (Virat Kohli) याच्यानंतर कसोटी कर्णधारपदासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) व्यतिर्कित जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि रिषभ पंत यांची नावे चर्चेत होती. पण दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच्या नावाची चर्चाही काही प्रमाणात झाली. अश्विनला नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपाच्या अंतिम सामन्यात बेंचवर बसवल्यामुळे त्याने नाराजी व्यक्त केली. याच मुलाखतीत त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद न मिळण्याचे कारणही सांगितले.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अश्विन म्हणाला, “अनेकांनी माझ्याविषयी असे मत बनवले की, मी जास्त विचार करतो. पण मला वाटते सलग 15-20 सामने खेळणाऱ्या खेळाडूला जास्त विचार करण्याची गरज नसते. पण एखाद्याला जर दोनच सामन्यात संधी मिळणार आहे, तर त्याला जास्त विचार करावा लागू शकतो. जर मला एखाद्याने सांगितले की, 15 सामने खेळायचे आहेत आणि तुझ्यावर लक्ष असेल. संघातील खेळाडूंची जबाबदारी तुझ्यावर असेल. संघाचे नेतृत्व तू करशील, तर मी जास्त विचार करणार नाही. तुम्हीच संघा मी कशासाठी जास्त विचार करेल?”
“एखाद्याला तो जरजेपेक्षा जास्त विचार करतो, हे बोलणेच चुकीचे आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रवास हा त्याचा स्वतःचा असतो. अशात दुसऱ्या कोणी यावर टिप्पणी देणे चुकीचे आहे.” जास्त विचार करणारा अशी ओळख झाल्यामुळे कोही नुसकात झाले का? या प्रश्नावर अश्विन म्हणाला, “हा टॅग माझ्याविरोधात वापरण्यासाठीच तयार केला गेला होता. हे योग्य आहे का? जेव्हा नेतृत्वाची चर्चा माझ्यापर्यंंत पोहोचली, तो काहींनी याच टॅगचा वापर माझ्याविरोधात केला. माझे नाव नेतृत्वासाठी पहिल्या यादीत नसते, असे काहीजण म्हटले.”
अश्विन सध्या भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यादीत पिहिल्या क्रमांकावरील अनिक कुंबळे यांनी 953 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकवर हरभजन सिंग आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 707 विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर अश्विन आहे, ज्याने 697 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विन या यादीत लवकरच हरभजनला मागे टाकू शकतो. (Ravichandran Ashwin could not become Test captain due to this reason. The spinner himself has given the reason)
महत्वाच्या बातम्या –
बापरे! बाल्कनीत बसून सामना पाहत होती महिला, फलंदाजाने षटकार मारल्यानंतर पुढे काय घडलं पाहाच
जागतिक योगा दिवस 2023 । केव्हा आणि कशी झाली योगा दिनाची सुरुवात? जाणून घ्या इतिहास