कोलंबोमध्ये श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना शुक्रवारपासून(23 नोव्हेंबर) सुरु झाला आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. याबरोबरच त्याच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.
कसोटीत सलग 8 किंवा अधिक वेळा नाणेफेक जिंकणारा तो जगातील 6वा कर्णधार ठरला आहे. केवळ काॅलीन क्वाॅड्रेने 9 वेळा कसोटीत नाणेफेक जिंकली आहे.
रुटच्या या विक्रमाबद्दल भारताचा आर अश्विनने एक मजेशीर ट्विट करताना मॅच रेफ्रींना गमतीने नाणेफेकीसाठी वापरण्यात येणारे नाणे तपासायला सांगितले आहे.
अश्विनने ट्विट केले आहे की ‘जो रुट सलग 8 वी नाणेफेक जिंकला आहे. इंग्लंड खूप चांगले क्रिकेट खेळत आहे, पण सलग नाणेफेक जिंकणे अविश्वसनीय आहे. मॅच रेफ्री तूम्ही नाणेफेकीसाठीचे नाणे तपासून घ्या.’
Annnndddd Joe Root wins his 8th toss in a row, yes England have played some awesome cricket, but such a winning streak with the toss is incredible. Dear match referees please check the coins you dish out😂😉 #EngvSL
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) November 23, 2018
रुटने आॅगस्टमध्ये इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत 5 वेळा नाणेफेक जिंकली होती तर या इंग्लंडच्या श्रीलंका दौऱ्यातही त्याने 3 पैकी 3 कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकली आहे.
विशेष म्हणजे या दोन्ही दौऱ्यात नाणेफेक खूपच महत्त्वाची ठरली. सध्या सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंड 2-0 अशा विजयी आघाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–जगातील सर्वच दिग्गज क्रिकेटपटूंचे विक्रम मोडले बांगलादेशच्या शाकिबने
–म्हणून धोनी २०११ विश्वचषक फायनलमध्ये युवराज आधी आला फलंदाजीला
–खेळाडूंना ‘सपोर्ट सिस्टीम’ मिळणे आवश्यक – चंदू बोर्डे