भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं (Ravichandran Ashwin) आयपीएलच्या नियमांबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्याचं म्हणणं आहे की, ‘इम्पॅक्ट प्लेअर’ हा आयपीएलमधील विशेष नियम आहे आणि तो रद्द केल्यास त्याची आवडही संपेल. अश्विननं ‘राईट टू मॅच’ बाबतही मत व्यक्त केलं. आयपीएल 2024 (IPL) मध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) खेळाडू आणि प्रशिक्षकांकडून ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमावर बरीच टीका झाली आहे.
कृष्णम्माचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यूट्यूब शो ‘चीकी चीका’ वर बोलताना अश्विन म्हणाला, ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम इतका वाईट नाही, कारण तो क्रिकेटमधील रणनीतीसारख्या घटकांवर अधिक भर देतो. मात्र, याची एक बाजू अशी आहे की, या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंना प्रोत्साहन तर मिळत नाहीच, पण असे करण्यापासून कोणीही रोखत नाही. ही पिढी अशी आहे की कोणताही फलंदाज गोलंदाजी करु इच्छित नाही.”
पुढे बोलताना अश्विन म्हणाला की, “अष्टपैलू खेळाडूंना ‘इम्पॅक्ट प्लेअर’ या नियमाचा फटका बसला आहे असे नाही. जरा व्यंकटेश अय्यरकडे पहा, तो काउंटी क्रिकेटमध्ये लँकेशायरसाठी आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे क्रिकेटमध्ये नवीन प्रयोग करण्याची संधी मिळते.”
आयपीएलच्या ‘राईट टू मॅच’ या नियमावर बोलाताना अश्विन म्हणाला, “जर कोणत्याही फ्रँचायझीला वाटत असेल की एखादा खेळाडू त्यांच्या पहिल्या चार किंवा पाचमध्ये कायम ठेवण्यासाठी नाही, तर लिलावादरम्यान त्यांच्या खेळाडूला खरेदी केल्यानंतर अचानक मध्ये येण्याचा त्यांचा अधिकार नाही. हा पर्याय खेळाडूंना देण्यात यावा. मग खेळाडू ठरवतील की त्यांना राईट टू मॅचचा वापर करायचा आहे की नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघात परतणार ‘हा’ स्टार खेळाडू? केलं मोठं वक्तव्य म्हणाला….
कोण आहेत रोहन जेटली? जे जय शाह यांच्यानंतर बीसीसीआयचे सचिव बनू शकतात
बांग्लादेश मालिकेपूर्वी श्रेयस अय्यर नव्या भूमिकेत; गौतम गंभीरचा डाव?