न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेतील पहिला सामना जयपूरमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पाच विकेट्स राखून न्यूझीलंडवर मात केली आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघासाठी दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने महत्वाचे योगदान दिले. तो या सामन्यात त्याच्या जुना फॉर्ममध्ये परतल्यासारखा दिसत होता. त्याने न्यूझीलंडला मर्यादित १६४ धावसंख्येवर रोखण्यासाठी संघाला मदत केली. सामन्यानंतर अश्विनला नवनियुक्त प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर अश्विनने त्याचे स्पष्ट मत मांडले आहे.
अश्विनने या सामन्यात त्याच्या चार षटकांमध्ये २३ धावा दिल्या आणि दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. सामना संपल्यानंतर राहुल द्रविड यांचे प्रशिक्षण कसे आहे, याविषयी प्रश्न विचारण्यात आला, ज्याचे अश्विनने एकदम स्पष्ट उत्तर दिले आहे.
तो म्हणाला की, ‘१९ वर्षाखालील संघासोबत त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत, पण जर मला त्यांच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीवर टिप्पणी करायची असेल, तर मी म्हणेल की, ही घाई होईल. मला माहीत आहे की, ते संधी सोडणार नाहीत. आता लक्ष आमच्या तयारी आणि प्रतिक्रियांवर असेल, ज्यामुळे भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आनंद पुन्हा येऊ शकेल.’
दरम्यान, या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १६४ धावा केल्या. न्यूझीलंडने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९.४ षटकांमध्ये विजय मिळवला. सामन्यात अश्विनची भूमिका महत्वाची राहिली.
भारतासाठी सर्वाधिक धावा तिसऱ्या क्रमांकावर फलंदासाठी आलेल्या सूर्यकुमर यादवने (६२) केल्या. तसेच सलामीवीर रोहित शर्माने (४८) महत्त्वाचे योगदान दिले. सलामीवीर केएल राहुल १५ धावा करून स्वस्तात बाद झाला. भारतासाठी भुवनेश्वर कुमारनेही उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि २४ धावा देऊन २ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. तर दुसरीकडे न्यूझीलंडसाठी सर्वाधिक ७० धावा सलामीवीर मार्टिन गप्टिलने केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठ्या मनाचा द्रविड!! सामन्यानंतर केले असे काही की, व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ
रोमहर्षक विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने ‘या’ २ खेळाडूंचे गायले गुणगान