भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने इंडिगो एअरलाइन्सविरोधात नाराजी दर्शवली आहे. इंडिगो एअरलाइन्स प्रवाशांच्या सुविधेबाबत अत्यंत बेफिकीर असल्याचे त्याचे म्हणणे आहे. इंडिगो एअरलाइन्समधील प्रवासाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर करताना तो म्हणाला की, इंडिगो एअरलाइन्स प्रवाशांनी आधीच बुक केलेल्या जागांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अश्विनने एअरलाईनवर जोरदार टिका केली आहे आणि आपल्याला फसवणूकीचा अनुभव आल्याचे सांगितले आहे. प्रवासाच्या अनुभवाबाबत अश्विनच्या मनात प्रचंड राग आहे. अश्विनआधी क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनाही याच एअरलाइन्सच्या निष्काळजीपणाचा अनुभव आला होता. याबाबत त्यांनी सोशल मीडियावरून तक्रारही केली होती.
This is becoming a regular menace @IndiGo6E ,my recent experience with them through a third party booking platform was terrible, they make you pay and then end up doing whatever they choose to do.
Not sure if it’s a scam !!
heyyy who is ever going to pull them up ???
All we… https://t.co/cMTf4fFvKh
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) August 26, 2024
रविचंद्रन अश्विनने हर्षा भोगलेंची पोस्ट रिपोस्ट केली आणि X वर लिहिले, ‘ही समस्या आता इंडिगो एअरलाइन्समध्ये सामान्य होत चालली आहे. इंडिगो एअरलाइन्समध्ये प्रवास करण्याचा माझा अनुभव अत्यंत वाईट होता. थर्ड पार्टी बुकिंग प्लॅटफॉर्मवरून बुकिंग केल्यानंतर, एअरलाइनने माझी बुक केलेली सीट दुसऱ्या कोणाला तरी हस्तांतरित केली. मला माहित नाही की यासाठी कोण जबाबदार आहे? तुम्ही पैसे दिले तरी तुम्हाला तुमची बुक केलेली सीट मिळेलच असे नाही.’
Another example of #IndigoFirstPassengerLast. An elderly couple on my flight had paid for seats in row 4 so they wouldn’t have to walk much. Without an explanation, #Indigo changed it to seat 19. The gentleman was going to struggle to walk till row 19 in a narrow passage. But who…
— Harsha Bhogle (@bhogleharsha) August 24, 2024
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही इंडिगो एअरलाइन्सवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या पोस्टनुसार, त्यांच्या फ्लाइटमधील एका वृद्ध जोडप्याला त्यांच्या बुक केलेल्या जागांवरून काढून टाकण्यात आले होते. त्यांनी त्या जागांसाठी आधीच पैसे दिले होते. जास्त चालावे लागू नये म्हणून या वृद्ध जोडप्याने चौथ्या रांगेत जागा बुक केली होती. परंतु कोणतीही माहिती न देता त्यांची जागा 19 व्या रांगेत बदलण्यात आलेली. अचानक झालेल्या या बदलामुळे वृद्ध दाम्पत्याला अडचणींचा सामना करावा लागलेला. या घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झालेली.