भारतीय संघाला आजपर्यंत एकापेक्षा एक कर्णधार मिळाले आहेत. त्यात कपिल देव, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर सलामीवीर रोहितने तिन्ही क्रिकेट प्रकारात भारतीय संघाचे नेतृत्व करत आपल्या निर्णय आणि संघाला यश मिळवून देण्याच्या क्षमतेने सर्वांना प्रभावित केले. यापूर्वी रोहित आयपीएलमध्ये सातत्याने आपल्या नेतृत्वाने सर्वांना प्रभावित करत आला आहे. तसेच, तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाला 5 किताब जिंकून देणारा कर्णधारही आहे.
मात्र, अलीकडेच पार पडलेल्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेत रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारताने शानदार प्रदर्शन केले. तसेच, संघ उपांत्य सामन्यापर्यंत अजिंक्य राहिला. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले. तसेच, भारताचे 12 वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. अशातच भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने रोहितच्या नेतृत्वाविषयी आपले मत मांडले.
अश्विनने रोहितच्या नेतृत्वाची तुलना जगातील दिग्गज कर्णधारांमध्ये गणल्या जाणाऱ्या एमएस धोनी (MS Dhoni) याच्याशी केली आहे. धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे, ज्याने आयसीसीचे तिन्ही किताब म्हणजेच, टी20 विश्वचषक, वनडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केले आहेत.
असे असले, तरीही अश्विन रोहितच्या नेतृत्वाने प्रभावित झाला आहे. विशेष म्हणजे, अश्विन एमएस धोनी आणि रोहित शर्मा (Ashwin On MS Dhoni And Rohit Sharma) या दोन्ही खेळाडूंच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेलवर माजी खेळाडू एस बद्रीनाथशी बोलताना भारतीय क्रिकेटच्या खास पैलूंवर भाष्य केले. तो म्हणाला, “जर तुम्ही भारतीय क्रिकेटवर नजर टाकली, तर प्रत्येकजण सांगत असेल की, एमएस धोनी सर्वोत्तम कर्णधार आहे. मात्र, रोहित शर्माला तुम्ही कमी लेखू शकत नाहीत. तोही लाजवाब आहे. तो संघातील प्रत्येक खेळाडूला चांगल्याप्रकारे समजतो. त्याला आम्हा सर्वांच्या आवडी-निवडीविषयीही माहिती आहे. तो प्रत्येक खेळाडूला वैयक्तिकरीत्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.”
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ
रोहित शर्मा अद्याप एकही आयसीसी किताब जिंकू शकला नाहीये. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 विश्वचषक 2022चा उपांत्य सामना, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि वनडे विश्वचषक 2023 अंतिम सामना खेळला आहे. मात्र, यादरम्यान भारताच्या हाती अपयश आले आहे. (ravichandran ashwin statement everyone will tell you ms dhoni best captain but rohit sharma)
हेही वाचा-
ऋतुराजचा शतकी धमाका पाहून भारावला आशिष नेहरा; म्हणाला, ‘प्रत्येकाला माहितीये…’
साई सुदर्शनची Team India मध्ये एन्ट्री होताच अश्विनला पराकोटीचा आनंद; म्हणाला, ‘या पोराने कुठलीच…’