वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात आजपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आजपासून भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे.
या सामन्यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने तर 8 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट्सचा टप्पा पूर्ण करेल. तसेच कसोटीमध्ये 200 विकेट्स घेणारा 10 वा भारतीय क्रिकेटपटू ठरेल.
याबरोबरच जडेजा कसोटीमध्ये सर्वात जलद 200 विकेट्स घेणारा आर अश्विन नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय गोलंदाज ठरेल. अश्विनने 37 कसोटी सामन्यात 200 विकेट्सचा टप्पा गाठला होता. जडेजाने सध्या कसोटीमध्ये 41 सामन्यात 23.68 च्या सरासरीने 192 विकेट्स घेतल्या आहेत.
वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात होत असलेली ही कसोटी मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपचा भाग आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–कर्णधार कोहलीकडून रिकी पॉटिंगच्या या खास विक्रमाला धोका…
–५५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्यापासून स्टुअर्ट ब्रॉड केवळ ३ विकेट्स दूर
–‘कॅप्टनकूल’ धोनीच्या त्या सर्वात मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची कर्णधार कोहलीला संधी