जून 18, 2021 पासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना सुरू होईल. द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे हा चुरशीचा सामना रंगणार आहे. सर्वात अगोदर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या न्यूझीलंड संघाकडे केन विलियम्सन, रॉस टेलर, टीम साउथी असे एकाहून एक सरस खेळाडू आहेत. त्यामुळे या बलाढ्य संघाला पराभूत करणे भारतीय संघासाठी आव्हानात्मक असणार आहे.
परंतु भारतीय संघाकडे असे अनेक खेळाडू आहेत, जे न्यूझीलंड संघावर मात करू शकतील. मात्र त्यांच्यापुढील मोठी म्हणजे संघात कोणत्या 11 खेळाडूंना स्थान द्यायचे? भारतीय संघाला अंतिम सामन्याअगोदर संघ निवडीला समोर जावे लागणार आहे. अशात इंग्लंडच्या खेळपट्टीवर भारतीय संघ रविंद्र जडेजा किंवा आर अश्विन या फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलूंना निवडेल की त्यांपैकी एकालाच जागा देईल? हा प्रश्न सर्वांना सतावत आहे.
जडेजा आणि अश्विन दोघेही संघाचा खूप महत्त्वाचा घटक
जडेजाने शेवटच्या 8 कसोटी सामन्यात 4 अर्धशतके झळकावली आहेत. सिडनी क्रिकेट मैदानावर शेवटच्या कसोटी सामन्यात त्याने 62 धावा देत 4 बळी घेतले होते. त्याची ही मागील कामगिरी पाहता तो संघात असण्याची दाट शक्यता आहे.
परंतु अश्विननेही उत्तम कामगिरी केली आहे. अश्विनने चेन्नईतील एमए चिदंबरम मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावले होते. याबरोबरच अश्विनने घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 4 कसोटी सामन्यात 32 बळी घेतले होते. या दोन्हीही खेळाडूंची मागील काही काळातील कसोटी क्रिकेटमधील कामगिरी दमदार राहिली आहे. अशात कसोटी अजिक्यंपद सामन्यात, डावखुरा फिरकीपटू की उजव्या हाताचा फिरकीपटू? दोघांपैकी कोणाला खेळवले जाईल, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये कधीही शुन्यावर बाद न झालेले दोन भारतीय क्रिकेटपटू
पॅट कमिन्सच्या ऐवजी ‘या’ गोलंदाजांना केकेआर देऊ शकतात उर्वरित आयपीएल २०२१ साठी संधी
सध्याच्या भारतीय संघातील ३ गोलंदाज, ज्यांनी विलियम्सनला कसोटीत केले सर्वाधिकवेळा बाद