---Advertisement---

२१ व्या शतकातील मोस्ट वॅल्यूएबल भारतीय क्रिकेटपटू म्हणून रवींद्र जडेजाची निवड

On: शुक्रवार, जुलै 3, 2020 7:34 AM
---Advertisement---

विस्डेनने नुकत्याच जाहीर केलेल्या २१ व्या शतकातील ‘मोस्ट वॅल्युएबल प्लेयर्स'(MVP) च्या यादीत भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) दुसरे स्थान पटकावत भारताचा “मोस्ट वॅल्युएबल प्लेयर” बनण्याचा मान मिळवला. विस्डेनने क्रिकविझ रेटींगच्या आधारे या खेळाडूंची निवड केली आहे.

जडेजाकडे भारताचा ‘मोस्ट वॅल्युएबल प्लेयर’ चा मान गेला असला तरी जगातील ‘मोस्ट वॅल्युएबल प्लेयर’ मात्र श्रीलंकेचा मुथैय्या मुरलीधरन (Muthaiyah Muralidharan) ठरला आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन स्टीव्ह स्मिथची (Steve Smith) वर्णी लागली.

क्रिकविझचे अधिकारी फ्रेडी वाईल्ड जडेजाचे कौतुक करताना म्हटले की, “जडेजाची गोलंदाजीतील सरासरी (२४.६२) महान फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) पेक्षा (२५.४१) सरस आहे. तर फलंदाजीची सरासरी ३५.२६ जी शेन वॉटसनच्या (Shane Watson) ३५.१९ फलंदाजी सरासरीहून उजवी आहे. क्रिकेटच्या तीनही प्रकारांत तो जबरदस्त कामगिरी करू शकतो.”

जडेजाने देखील आपल्या ट्विटरवरून विस्डेनचे आभार मानले आहेत. जडेजाने ट्विट करत म्हटले आहे की ‘विस्डेन इंडिया, मला ‘मोस्ट वॅल्युएबल प्लेयर’ चा मान दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या देशासाठी माझे सर्वोत्तम देण्याचे माझे ध्येय आहे, म्हणूनच मी माझ्या मी माझ्या सर्व संघातील सहकारी, प्रशिक्षक, चाहते आणि हितचिंतकांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानू इच्छितो. जय हिंद’

जडेजाने ४९ कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करताना २१३ बळी मिळवत १८६९ धावा काढल्या आहेत. सोबतच १६५ एकदिवसीय सामन्यात २२९६ धावा केल्या असून व १८७ बळी घेतले आहेत आहे. तसेच ४९ आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये त्याने ३९ बळी घेतले आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी – 

एका महान क्रिकेटपटूचे निधन, वडील भारताकडून खेळले होते क्रिकेट तर मुलगा पाकिस्तानकडून

आयपीएल तर होणार! बीसीसीआय या देशांत करतेय आयोजनाची चाचपणी

आश्चर्यकारक! बीसीसीआय नाही तोडणार चीनी कंपन्यांशी संबंध; म्हणतात, कधीच…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---