ऍशेस मालिकेतील (ashes series) चौथा कसोटी सामना खूपच रोमांचक ठरला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजय मिळवण्यासाठी फक्त एका विकेटची आवश्यकता होती. पण त्यांना ही विकेट मिळाली नाही. शेवटची विकेट मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने फलंदाजाच्या चारी बाजूस क्षेत्ररक्षक उभे केले होते. परंतु, याचा काही फायदा झाला नाही. अशातच आयपीएल (IPL) फ्रेंचायझी कोलकाता नाइट रायडर्सने (Kolkata Night Riders) मात्र एक ट्विटर पोस्ट केली आहे, जी सध्या व्हायरल होत आहे.
ऍशेसच्या या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने शेवटच्या क्षणांमध्ये ज्यापद्धतीने खेळाडूंना क्षेत्ररक्षणासाठी उभे केले होते, कोलकाता नाइट रायडर्सने त्याची तुलना आयपीएलमधील एका सामन्याशी केली आहे. आयपीएल २०१६ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये झालेल्या एका सामन्यात, गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) नेतृत्वातील केकेआरने अशाच प्रकारे क्षेत्ररक्षण उभे केले होते. यावेळी पुणे संघाचे नेतृत्व करणारा एमएस धोनी (ms dhoni) फलंदाजीसाठी आला होता. धोनीला रोखण्यासाठीच केकेआरने हे क्षेत्ररक्षण लावले होते.
That moment when a classic move in Test cricket actually reminds you of a T20 master stroke! #Ashes #KKR #AmiKKR #AUSvENG pic.twitter.com/D3XbMu83mf
— KolkataKnightRiders (@KKRiders) January 9, 2022
केकेआरने आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील या कसोटी सामन्याची आणि २०१६ मध्ये खेळल्या गेलेल्या पुणे आणि कोलकाता यांच्यातील आयपीएलमधील सामन्याची तुलना केली आहे. केकेआरने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “हा कसोटी क्रिकेटमधील उत्कृष्ट रणनीतीचा एक क्षण आहे, ज्याने एका टी२० सामन्यातील मास्टर स्ट्रोकची आठवण करून दिली आहे.” या पोस्टवर भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने एक गमतीशीर कमेंट केली आहे. कमेंटमध्ये त्याने लिहिले की, “हा कोणता मास्टर स्ट्रोक नाहीय, हा फक्त शॉ-ऑफ आहे.” ही पोस्ट सध्या चाहत्यांमध्ये वेगाने व्हायरल होत आहे.
https://twitter.com/imjadeja/status/1480142226307047425?s=20
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या या चौथ्या कसोटी सामन्याचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. परंतु, इंग्लंडने त्यांची शेवटची विकेट गमावली नाही. इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या डावात ३८८ धावांचे मोठे लक्ष्य मिळले होते, जे त्यांना गाठता आले नाही. परिणामी, सामना अनिर्णीत राहिला. ऍशेस मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून ३-० अशी विजयी आघाडी देखील घेतली आहे. आता ऍशेस मालिकेतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवून इभ्रत राखण्याचा इंग्लंड संघाचा प्रयत्न असेल.
महत्वाच्या बातम्या –
पुणेरी पलटण विजयी मार्गावर! युवा अस्लम इनामदारची धडाकेबाज कामगिरी
वरिष्ठ आणि खुली स्प्रिंट राष्ट्रीय रोइंग अजिंक्यपद स्पर्धा: महाराष्ट्राच्या संघाला ब्राँझ
Video: स्मिथमध्ये पुन्हा दिसली ‘वॉर्न’ची झलक, इंग्लंडच्या लीचला असं पकडलं फिरकीच्या जाळ्यात
व्हिडिओ पाहा –