इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामासाठी ८ दिवसांचाच कालावधी राहिला आहे. येत्या ९ एप्रिलपासून या हंगामाला सुरुवात होणार आहे. या हंगामापूर्वी सर्व संघांचे खेळाडू आपापल्या संघात दाखल झाले आहेत. तसेच अनेक संघाचे फोटो शुटही झाले आहेत. हे फोटो व्हायरलही होत आहेत. तसेच खेळाडू देखील संघात दाखल झाल्यानंतरचे फोटो शेअर करत आहेत. नुकताच रविंद्र जडेजानेही एमएस धोनीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्या या पोस्टबद्दल सध्या बरीच चर्चा होत आहे.
जडेजाने चेन्नई संघात दाखल झाल्यानंतर ट्विटरवर धोनीबरोबर चर्चा करतानाचे फोटो शेअर केले आहे. या फोटोंना त्याने कॅप्शन दिले आङे की ‘मी जेव्हा पण त्याला (धोनीला) भेटतो, तेव्हा असं वाटतं की मी त्याला पहिल्यांदाच भेटत आहे. साल २००९ ला त्याला भेटलो होतो, तसाच उत्साह आजही आहे.’
Whenever i meet him it feels like i m meeting him for the first time!Still Same excitement when i met him in 2009.#bonding #respectforever pic.twitter.com/Obmh9PIVAR
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) April 2, 2021
जडेजाची ही पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच चाहत्यांच्या प्रतिक्रियाही मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. विशेष म्हणजे जडेजाच्या कॅप्शनने अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत.
Priceless bonding 💛 pic.twitter.com/B7m5vNHoGu
— 𝒜𝓃𝒾𝓈𝒽𝒶 ⁰⁷🏏 (@tweet_anisha) April 2, 2021
So happy MSD got many "genuine" friends and admirers of him around 😭❤️
— Achhu (@Achhyuthaa) April 2, 2021
Thala ka jaadu or thala ka jaddu
Its mahi's magic or mahi's sir jadeja
Love this bond with addition of suresh rainaaa😊😊— Kartik (@imgoyalkartik07) April 2, 2021
That's our Yellovely bonding 😁💛 pic.twitter.com/Yc6bVXLRqH
— MSDian™ (@ItzThanesh) April 2, 2021
https://twitter.com/JRism9/status/1377870062573342721
#Jadeja
Sir jadeja doesn't run to take the catch but the ball finds him and lands on his hand :- MSDhoniHow its Started How its going pic.twitter.com/J6GV6ugC5x
— ShikhaRai 👩🎓 (@mahifangirl07) April 2, 2021
आयपीएलमधून जडेजा क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन
जडेजाला २०२०-२१ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी कसोटीदरम्यान दुखापत झाली होती. त्याचा हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे त्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली होती. त्याचकारणामुळे जडेजाला इंग्लंडविरुद्ध मायदेशात झालेल्या सर्व सामन्यांना मुकावे लागले होते.
यादरम्यान तो बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) येथे सराव करत होता. त्यानंतर तो चेन्नई संघात दाखल झाला आहे. त्यामुळे आता जवळपास ४ महिन्यांनतर जडेजा आयपीएलमधून मैदानावर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे.
चेन्नईची आयपीएल २०२१ ची सुरुवात मुंबईतून
यंदा चेन्नई संघाचे पहिले ५ सामने मुंबईत होणार आहेत. त्यानंतर चेन्नई साखळी फेरीतील पुढील सामने दिल्ली, बंगळुरु आणि कोलकाता येथे खेळणार आहे. चेन्नईचा पहिला सामना १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे.
जडेजाची कारकिर्द
जडेजाने ५१ कसोटी सामने खेळले असून यात १९५४ धावा केल्या आणि २२० विकेट्स घेतल्या आहेत. तसेच १६८ वनडे सामन्यात त्याने २४११ धावा केल्या आहेत आणि १८८ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने ५० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने २१७ धावा केल्या असून ३९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने आयपीएलमध्ये १८४ सामने खेळले असून २१५९ धावा केल्या असून ११४ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
वर्ल्डकप विजयानंतर धोनीने का केले होते मुंडण? तत्कालीन टीम मॅनेजरने उलगडले कारण
केक, थोडीशी मस्ती आणि सर्वांची उपस्थिती! सीएसकेच्या गुरूचा वाढदिवस झाला दणक्यात साजरा, पाहा व्हिडिओ
महाकठीण! आयपीएलमधील धोनी-कोहलीने केलेले ‘हे’ विक्रम रोहितलाही मोडणे आहे केवळ अशक्य