रविंद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा जामनगर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाली. नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. रिवाबा जडेजा देखील भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती आणि तिने विजय देखील मिळवला. पत्नीच्या विजयानंतर रविंद्र जडेजा देखील आनंदात आहे आणि त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत जडेजा ढोल वादकांवर पैसे उधळताना दिसत आहे.
पत्नीच्या विजयानंतर जडेजा चांगलाच खुश आहे आणि त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि त्याचे समर्थक रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) हिच्या विजयानंतर आनंद व्यक्त करत आहेत. जल्लोष ढोल ताशाच्या जगराहस साजरा केला जात असताना जडेजाने वादकांवर पैसे उधळल्याचे समोर येत आहे. व्हायरल व्हिडिओत जडेजा वादकांवर दहा-दहा रुपयांच्या नोटा उधळत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर चाहत्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. काहीने ट्वीट करत अशी प्रतिक्रियाही दिली आहे की, जडेजा आयपीएलमध्ये कमावलेला पैसा खर्च करत आहेत.
https://twitter.com/GemsOfCricket/status/1601100731981115392?s=20&t=PbXEntpqDWYwZTT0RDQCHQ
दरम्यान, रविंद्र जडेजा मागच्या काही महिन्यांमध्ये सतत दुखापतीशी झगडताना दिसला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला टी-20 विश्वचषक 2022 मधून माघार घ्यावी लागली. मधल्या काळात त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया देखील केली केली. असे असले तरी, तो लवकरच क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करू शकतो. पुनरागमनासाठी त्याने सरावाला सुरुवात केली आहे. जडेजा दुखापतीच्या कारणास्तवच नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेत खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत भारताला 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिका संपल्यानंतर 14 डिसेंबरपासून कसोटी मालिका खेळली जाणार आहे. कसोटी मालिकेतील पहिल सामना 14 ते 18 डिसेंबर यादरम्यान खेळला जाणार आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 22 ते 26 डिसेंबर दरम्यान खेळला जाईल. कसोटी मालिकेपूर्वी जडेजा संघात पुनरागमन करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र, हे सर्व त्याची फिटनेस पाहून ठरणार, हे देखील तितकेच महत्वाते आहे. कसोटी मालिकेपूर्वी जडेजा पूर्णपणे फिट होईल, याची शक्यता खूपच कमी आहे. जडेजाच्या जागी सौरभ कुमराला कसोटी संघात घेतले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. (Ravindra Jadeja squandered money on drummers)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उनादकतच्या पुनरागमनानंतर पाच वर्षापासून बाहेर असलेला फलंदाज मागतोय संधी; ट्विट करत लिहिले, ‘प्रिय क्रिकेट…’
द्विशतक ईशानचं, पण लक्ष वेधतोय विराटचा भांगडा; व्हिडिओ पाहून तुमचेही थिरकतील पाय