इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव २७८ धावांवर संपुष्टात आला. मध्यफळीतील अनुभवी फलंदाजांनी निराशा केल्यानंतर केएल राहुल व अष्टपैलू रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावत भारतीय संघाला धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. जडेजाने अर्धशतकानंतर आपले नेहमीचे तलवार सेलिब्रेशन करत चाहत्यांची मने जिंकली.
जडेजाने ठोकले दमदार अर्धशतक
तिसर्या दिवशी सकाळी रिषभ पंत लवकर बाद झाल्यानंतर जडेजा मैदानावर उतरला. केएल राहुलच्या साथीने त्याने संघाचा डाव सावरला. दोघांनी सहाव्या गड्यासाठी ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. राहुल बाद झाल्यानंतरही जडेजाने शानदार फलंदाजी सुरू ठेवली व अर्धशतक झळकावले. अर्धशतकानंतर त्याने आपल्या नेहमीच्या शैलीतील तलवारबाजीचे प्रत्यक्षिक केले. तो ८६ चेंडूमध्ये ८ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ५६ धावा काढून बाद झाला.
जडेजाने या खेळीदरम्यान एका खास विक्रमाला गवसणी घातली. जडेजा कसोटीमध्ये २०० बळी व २००० धावा बनवणारा पाचवा अष्टपैलू बनला. यापूर्वी अशी कामगिरी कपिल देव, अनिल कुंबळे, हरभजनसिंग व रविचंद्रन अश्विन यांनी केली होती.
Ravindra Jadeja departs soon after scoring his 16th half-century. Fine innings from the swordsman! 🙌🏻 #PlayBold #TeamIndia #ENGvIND pic.twitter.com/AefCvjJXOm
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) August 6, 2021
भारतीय संघाला मिळाली धावांची आघाडी
इंग्लंडला पहिल्या डावात १८३ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावात दमदार फलंदाजी केली. केएल राहुल व रोहित शर्मा यांनी संघाला ९७ धावांची सलामी दिली. मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानंतर रवींद्र जडेजाने शानदार अर्धशतक आणि तळाच्या फलंदाजांनी महत्त्वपूर्ण योगदान देत भारताला ९५ धावांची आघाडी मिळवून दिली. भारतातर्फे राहुलने सर्वाधिक ८४ धावा बनविल्या. इंग्लंडसाठी ओली रॉबिन्सनने सर्वाधिक ५ तर, अनुभवी जेम्स अँडरसनने ४ बळी आपल्या नावे केले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘डीके ऑन टूर!’ कॉमेंट्री बॉक्समधून बाहेर पडत दिनेशने लंडनमध्ये चालवली अनोखी स्कूटर; व्हिडिओ व्हायरल
‘किंग’ कोहलीने पत्नी अनुष्कासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा केला शेअर; वडिलांचीही काढली आठवण
विराट कोहलीने ‘या’ युवा खेळाडूकडून फलंदाजी शिकण्याची गरज, माजी पाकिस्तानी खेळाडूचा सल्ला