भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला गेला. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर यजमान भारतीय संघाने तिसऱ्याच दिवशी हा सामना संपवला. या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारतीय क्रिकेटपटूंनी या संपूर्ण सामन्यात जबरदस्त कामगिरी करून दाखवली. त्यानंतर या विजयात सर्वात मोठे योगदान दिलेल्या अष्टपैलू रवींद्र जडेजा याने ऑस्ट्रेलियन संघाची खिल्ली उडवली.
हा सामना सुरू होण्यापूर्वी खेळपट्टी कशी असेल याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. पहिल्या दिवशीपासून चेंडू फिरकी घेणार असे ऑस्ट्रेलियन खेळाडू व मीडिया म्हणताना दिसली. मात्र, प्रत्यक्ष सामन्यात खेळपट्टीवर फिरकीपटूंना फारशी मदत दिसलीच नाही. तरीही भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 177 धावांवर गुंडाळला. त्यानंतर भारतीय संघाने फलंदाजी करताना 400 धावा उभ्या केल्या. ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावातही ढेपाळला. केवळ 91 धावांवर सर्वबाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 132 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. खेळपट्टीवर मदत नसतानाही भारताच्या फिरकी गोलंदाजांनी मिळून 16 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
या सामन्यानंतर प्रसारण वाहिनीची गप्पा मारताना या सामन्यात सामनावीर ठरलेल्या रवींद्र जडेजा याने ऑस्ट्रेलियन संघाची खिल्ली उडवली. तो म्हणाला,
“खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना हवी तितकी मदत नव्हती. मला तर वाटते ऑस्ट्रेलियन संघ ज्यावेळी भारतात येण्यासाठी विमानात बसला, त्यावेळीच ते चेंडू वळणार या विचाराने घाबरले होते. खेळपट्टीची हीच भीती त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली.” जडेजासह दुसरा अष्टपैलू अक्षर पटेल यानेदेखील ऑस्ट्रेलियन संघाला टोमणे मारताना म्हटलेले की, ”आम्ही फलंदाजी करताना खेळपट्टी आमच्या बाजूने होती तर गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध”
भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण व माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील ऑस्ट्रेलियन मीडियाला याच मुद्द्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
(Ravindra Jadeja Troll Australian Team After Nagpur Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतासाठी धोक्याची घंटा! ऑस्ट्रेलियाने मायदेशाहून बोलावला हुकमी एक्का, कोण आहे तो?
भारताच्या विजयांमध्ये सर्वात मोठे योगदान अश्विनचेच, भज्जी अन् झहीर खान तर लईच लांब