आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 55 वा सामना सोमवारी(2 नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात बंगलोरचा पराभव झाला. मात्र पराभवानंतरही नेट रनरेट अधिक असल्याने या संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात यश आले. या सामन्यात बेंगलोरचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलने उत्कृष्ट फलंदाजी केली. संघाला प्ले ऑफ पर्यंत पोहोचवण्यात त्याने कशी मोलाची कामगिरी बजावली हे आपण या लेखात पाहाणार आहोत.
…अशी कामगिरी करणारा देवदत्त पहिलाच खेळाडू
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करत 7 गडी गमावून 152 धावा केल्या. त्यांच्याकडून सलामीवीर देवदत्त पडिक्क्कलने 41 चेंडूत 50 धावा केल्या. आयपीएल 2020 मधील हे त्याचे पाचवे अर्धशतक आहे. आयपीएलमधील तो पहिला खेळाडू आहे ज्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळता पहिल्याच हंगामात पाच अर्धशतकं ठोकली आहेत.
DDP brings up his 🖐🏻th half-century of #Dream11IPL 2020. Well played champ! 👏🏻👏🏻@devdpd07#PlayBold #IPL2020 #WeAreChallengers #DCvRCB pic.twitter.com/1rIeFJtig2
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 2, 2020
..म्हणून पराभवानंतरही बेंगलोर प्ले ऑफसाठी ठरला पात्र
प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने दिल्ली आणि बेंगलोरसाठी सोमवारचा सामना खूप महत्वाचा होता. मात्र, बेंगलोरचा या सामन्यात पराभव होऊनही या संघाने नेटरनरेटच्या आधारावर प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे.
आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने 7 बाद 152 धावा केल्या होत्या. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला कोलकाता नाईट रायडर्सपेक्षा जास्त रनरेट राखायचा असेल, तर त्यांना कमीत कमी 134 धावा करायच्या होत्या. दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघालाही कमीत कमी 17.3 षटकांत दिल्लीला लक्ष्यापासून दूर ठेवावे लागणार होते.
त्यानुसार दिल्लीने 153 धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या 19 षटकात पार केल्याने दिल्ली आणि बेंगलोर हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये दाखल झाले आहेत.
We have the three qualifiers for #Dream11IPL 2020.
Who will take the vacant spot? pic.twitter.com/6PkxK6nzsa
— IndianPremierLeague (@IPL) November 2, 2020
देवदत्त पडिक्कल आहे बंगलोरचा हुकमी एक्का
देवदत्त बेंगलोर संघात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. देवदत्तने 14 सामन्यांत 33.71 च्या सरासरीने 472 धावा केल्या आहेत. यामध्ये या सामन्यातील अर्धशतकाचाही समावेश आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. केवळ केएल राहुल (670) आणि शिखर धवन (525) यांना या स्पर्धेत पडिकक्कलपेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत.
पडिक्कलमुळे बंगलोर प्लेऑफमध्ये
या सर्व कारणांमुळे देवदत्त पडिक्कलच्या कामगिरीमुळे बेंगलोर संघ प्लेऑफमध्ये पोहोचला, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
मागील हंगामात मिळाली नाही संधी
देवदत्त मागील हंगामातही बेंगलोर संघाचा भाग होता. पण मागील हंगामात विराटने कदाचित त्याच्यावर विश्वास ठेवला नसेल. कारण देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही देवदत्तला विराट कोहलीने एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या –
मोहम्मद सिराजच्या घातक चेंडूवर पृथ्वी शॉ क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ
‘बेंगलोरमध्ये जिंकण्याची क्षमता नाही’, इंग्लंडच्या दिग्गजाचे रोखठोक मत
…म्हणून सूर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी झाली नाही निवड, भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचा खुलासा
ट्रेंडिंग लेख –
विरेंद्र सेहवागची ‘ती’ शतकी खेळी कोणताही क्रिकेट चाहता विसरू शकत नाही!
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?