इंडियन प्रीमियर लीग 2021 स्पर्धेची प्रतीक्षा करण्याची वेळ आता जवळजवळ संपली आहे. कारण अवघ्या काही तासांतच या जगातील सर्वात प्रसिद्ध टी-20 लीगला सुरूवात होणार असून या स्पर्धेचा पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. तत्पुर्वी आरसीबी संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दैनिक जागरणशी संवाद साधताना या स्पर्धेतील आपल्या नियोजनाविषयी सांगितले.
यामध्ये त्याने सांगितले की, या स्पर्धेची तो बऱ्याच काळापासून वाट पाहत असून यंदाच्या सत्रात त्याला आपल्या आरसीबी संघासाठी आयपीएल विजेतेपद मिळवायचे आहे. कारण आतापर्यंत आरसीबीने एकदाही विजेतेपद जिंकलेले नाही. तसेच तो गोलंदाजीबद्दल सांगिताना म्हणाला की, तो यॉर्कर गोलंदाजीला अधिक धारदार बनविण्यासाठी विशेष तयारी करत आहे. जेणेकरून तो डेथ ओव्हरमध्ये याचा वापर करू शकेल.
सिराज म्हणाला की, “आमच्या संघात विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे तडाखेबाज फलंदाज आहेत. सराव सत्रात या सर्वांना गोलंदाजी केल्याचा फायदा निश्चितच आम्हाला आगामी सामन्यांमध्ये होणार आहे. पहिल्या सामना आम्ही मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार असून या संघातील धाकड फलंदाज कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा या सर्व फलंदाजांना कशाप्रकारे गोलंदाजी करायची याचेही नियोजन आम्ही केले आहे. या महान धडाकेबाज फलंदाजांसमोर गोलंदाजी केल्यास आत्मविश्वास वाढतो आणि बरेच काही शिकण्यास मिळते.”
तसेच तो म्हणाला की, “विराट कोहली आपल्या सभोवताली जरी राहीला तरी त्याच्याकडून आपण बरेच काही शिकू शकतो. त्याने क्रिकेटपेक्षा शरीर तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष दिले आहे. तसेच गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढावा म्हणून तो आपल्या गोलंदाजांना नेहमी स्वातंत्र्य देत असतो. तसेच ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावायचे आहे त्याचे सुद्धा स्वातंत्र्य देतो. कोणत्याही गोलंदाजासाठी ही एक चांगली गोष्ट असते आणि त्यामुळे त्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हाही मुंबई इंडियन्सने खेळला आयपीएलचा सलामीचा सामना, तेव्हा ‘अशी’ झाली आहे संघाची कामगिरी
युजवेंद्र चहल बनला अंडरटेकर; ६ फुट ८ इंच उंची असलेल्या खेळाडूबरोबर बनवला भन्नाट व्हिडिओ, एकदा पाहाच