विराट कोहली कर्णधार असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ यावर्षी वेगळ्याच अंदाजात असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या हंगामातील आतापर्यंतच्या जबरदस्त प्रदर्शनामुळे त्यांच्यासाठी प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झाल्याप्रमाणेच आहे. मात्र सर्व काही सुरळीत चालू असताना बेंगलोरला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज आणि डेथ ओव्हर स्पेशलिस्ट नवदिप सैनीला दुखापत झाली आहे.
बेंगलोरचे फिजिओ इव्हान स्पिचली यांनी याची माहिती दिली आहे. रविवारी (२५ ऑक्टोबर) दुबईत चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात १८व्या षटक टाकताना त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानाबाहेर पडला होता.
सैनीविषयी बोलताना स्पिचली म्हणाले की, “चेन्नईविरुद्धच्या सामन्यात १८व्या षटकातील शेवटचा चेंडू टाकताना सैनीच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या अंगठ्याला टाकेही पडले आहेत. पण सुदैवाने आमच्याकडे चांगले सर्जन उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याच्यावर उपचार चालू आहेत. मात्र अद्याप त्याच्या दुखापतीबद्दल जास्त काही सांगता येणार नाही. त्यामुळे तो पुन्हा कधी मैदानावर उतरेल हे सांगणे कठीण आहे.”
“४-५ वर्षांपुर्वी विराटलाही सामन्यादरम्यान अशीच दुखापत झाली होती. पण आम्ही उपचार केल्यानंतर त्याचा रक्तस्त्राव थांबला होता. त्यानंतर विराटने फलंदाजी करताना शतकही झळकावले होते,” असे पुढे बोलताना स्पिचली यांनी सांगितले.
बेंगलोरने आतापर्यंत हंगामातील ११ सामने खेळल असून त्यातील ७ सामने जिंकले आहेत, तर ४ सामने गमावले आहेत. यासह बेंगलोर संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. त्यांचा पुढील सामना २८ ऑक्टोबरला अबु धाबीत मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘दसऱ्याच्या मेळ्यातून केली जोरदार शॉपिंग,’ सॅम करनच्या नव्या लूकवर जबरदस्त मिम्स व्हायरल
हार्दिक पंड्याने केलाय नवा विक्रम, ‘सिक्सर किंग’ युवराजलाही टाकले मागे
‘२०२१ वर्ष आपलंच असेल!’, चेन्नईचे आव्हान संपल्याने ट्विटरवर आल्या भावनिक प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ
कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी
अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती