नवी दिल्ली। जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी२० लीग आयपीएलच्या १३ व्या हंगामाच्या आयोजनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. कोरोना व्हायरसमुळे मार्चमध्ये स्थगित केलेली आयपीएल स्पर्धा आता १९ सप्टेंबरपासून यूएईत सुरु होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन जरी भारतात होणार नसले, तरी चाहत्यांना या स्पर्धेचा आनंद लुटता येणार आहे. आयपीएल २०२० स्पर्धेसाठी काही संघ यूएईला पोहोचले आहेत, तर काही संघ रवाना होण्याच्या तयारीत आहेत.
यांमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ यूएईला पोहोचले आहेत. त्यानंतर आता विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघही (Royal Challengers Bangalore) आज (२१ ऑगस्ट) यूएईला रवाना होणार आहे.
आरसीबीचे चेअरमन संजीव चुरीवाला (Chairman Sanjeev Churiwala) यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसमुळे यावेळी संघाला नियमांचे पालन करावे लागेल. ते म्हणाले, “आरसीबी संघाची सर्वात मोठी ताकद ही त्यांना चाहत्यांकडून मिळणारे प्रेम आणि समर्थन आहे. या हंगामात हे खूपच वेगळ्या प्रकारचे असणार आहे, जिथे स्टेडिअममध्ये चीअर करण्यासाठी चाहते नसतील. आणि रस्त्यावरही ओरडून संघाला शुभेच्छा देणारी गर्दीही नसेल.”
“इतकेच नव्हे तर यावेळी २ महिन्यांपेक्षा अधिक काळ संघाला जैव- सुरक्षित वातावरणात आयसोलेट केले जाईल. आपण सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरूस्तीसाठी खूप महत्त्वाचे असते. आम्ही नेहमीच आरसीबी संघासोबत एक खूपच शानदार वातावरणाचा अनुभव घेत असतो. विशेषत: या वर्षी आम्ही संघाला आणखी पाठिंबा देणे, हे आणखी गरजेचे ठरते. ज्यामुळे ते जेव्हा मैदानावर पाऊल ठेवतील, त्यावेळी ते खरं तर एका चॅलेंजर्सप्रमाणे दिसतील,” असेही अध्यक्ष चुरीवाला पुढे म्हणाले.
आरसीबी संघ आज यूएईला रवाना होणार आहे आणि ३ आठवड्यांच्या शिबिराचे आयोजन करणार आहे. यांमध्ये भारतीय आणि परदेशी खेळाडू माईक हेसन आणि सायमन कॅटिज यांच्यासोबत असतील. हे शिबिर २९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्राला ‘कॅप्टन कूल’ धोनीची खास प्रतिक्रिया
-हा दिग्गज म्हणतोय, जर मोदींनी धोनीला संपर्क करून टी-२० विश्वचषकात खेळण्यास सांगितले, तर…
-मी भारतात येईल की नाही माहित नाही, परंतू माझी मुलं मात्र भारताविरुद्ध क्रिकेट नक्की खेळतील
ट्रेंडिंग लेख-
-खेलरत्न पुरस्कारासाठी पात्र होते हे ४ भारतीय दिग्गज क्रिकेटर, पण नाही मिळाला हा सन्मान
-एमएस धोनीने विराट कोहलीला दिले हे ५ मॅच विनर खेळाडू
-सुरेश रैनाने खेळलेल्या ५ महत्त्वाच्या खेळी, ज्यामुळे त्याला भारतीय क्रिकेटमध्ये विशेष ओळख…