महिला प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (१७ मार्च) खेळवला जाणार आहे. हा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळवला जाणार आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश केलेला असल्याने यंदा डब्ल्युपीएलला नवा विजेता मिळणार हे निश्चित झाले आहे.
याबरोबरच, या दोन्हीपैकी कोणताही संघ जिंकला, तरी त्या संघाच्या फ्रँचायझीचे हे पहिले विजेतेपदही ठरणार आहे. कारण या दोन्ही संघांच्या फ्रँचायझीला अद्याप आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेली नाही. अशातच बंगळुरूला जर अंतिम सामना जिंकायचा असेल तर त्यांनी या स्टार खेळाडूचा संघात समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.
अशातच डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्याबाबत आरसीबीच्या करोडो चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. तसेच16 वर्षांची त्यांची प्रतीक्षा संपणार आहे, अशी आशा चाहत्यांना आहे. बंगळुरूचा संघ 2008 पासून आयपीएल खेळत आहे, मात्र आजपर्यंत एकही ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. अशा परिस्थितीत चाहत्यांची प्रतीक्षा आज संपुष्टात येऊ शकते. जे काम विराट कोहलीच्या पुरुष संघाला करता आले नाही ते काम आता स्मृती मंधानाच्या महिला संघाला करता येणार आहे.
यासाठी एलिस पेरीने याआधी नॉकआऊट लीग सामन्यात मुंबईविरुद्ध अप्रतिम कामगिरी केली होती. गोलंदाज म्हणून पेरीने 4 षटकात 15 धावा देत 6 बळी घेतले. याशिवाय त्याने फलंदाजीमध्ये 40 प्लस धावा केल्या. यानंतर दुसऱ्या सामन्यातही पेरीने ६६ धावांची शानदार खेळी केली. त्यामुळे बंगळुरूची धावसंख्या १३५ धावांपर्यंत पोहोचू शकली होती. त्यामुळे एलिस पेरीचे संघात असणे आरसीबीच्या फायद्याचे ठरू शकते.
The Captains are 𝗥𝗘𝗔𝗗𝗬 for the summit clash 🏆
ARE. YOU❓ #TATAWPL | #DCvRCB | #Final | @DelhiCapitals | @RCBTweets | @mandhana_smriti pic.twitter.com/Na4UY55Sy4
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 16, 2024
दरम्यान, डब्ल्युपीएल २०२४ मध्ये साखळी फेरीनंतर गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवून दिल्ली कॅपिटल्सने थेट अंतिम सामना गाठला होता. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत करत अंतिम सामना गाठला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IPL 2024 : नवीन कर्णधार, अन् प्रमुख खेळाडूंना दुखापत, पाहा गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग 11
- आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी पंजाब किंग्सने नवीन जर्सी केली लॉन्च, पाहा जर्सीचा फर्स्ट लुक