रविवारी (१७ एप्रिल) क्रिकेट चाहत्यांना दोन रंगतदार सामने पाहण्याची संधी मिळाली होती. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ३८ धावांनी विजय मिळवत आयपीएल २०२१ हंगामातला सलग तिसरा विजय नोंदवला. यामध्ये ग्लेन मॅक्सवेलने अर्धशतकी खेळी केली होती. त्याने अर्धशतक झळकावताच कर्णधार विराट कोहलीने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात कर्णधार कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बेंगलोर संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही. विराट कोहली आणि रजत पाटीदार हे लवकर माघारी परतले होते. त्यांनतर मैदानात ग्लेन मॅक्सवेल नावाचे वादळ आले होते. या वादळात ग्लेन मॅक्सवेलच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत होता. त्याने अवघ्या २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते.
अर्धशतक पूर्ण करताच डगआऊटमध्ये असलेल्या कर्णधार कोहलीला प्रचंड आनंद झाला होता. तो उभा राहून टाळ्यांच्या वाजवत ग्लेन मॅक्सवेलचे कौतुक करत होता. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
MaX Factor Yet Again✨🦸🏻♂
Back To Back Fighting Fifties By Glenn Maxwell In IPL 2021.
What A Start #BiG_Show💪🏻 #RCBvKKR #IPL2021 pic.twitter.com/3E8WwC6GjB— Arbaz Hussain🇵🇰 (@ArbazHus77) April 18, 2021
https://twitter.com/vivekdwivedi287/status/1383735182193160197?s=20
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर २०४ धावा केल्या होत्या. यामध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिविलियर्सने महत्वाची भूमिका बजावली होती. विराट कोहली या सामन्यात ५ धावा करत माघारी परतला होता. तर पडीक्कलने २५ धावांची खेळी केली होती. तसेच या सामन्यात पदार्पण करणाऱ्या रजत पाटीदारने अवघी १ धावा केल्याचे पाहायला मिळाले होते. तर दुसरीकडे ग्लेन मॅक्सवेलने ४९ चेंडूत ७८ धावांची खेळी केली होती. यात त्याने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले होते. तसेच एबी डिविलियर्सने देखील ७६ धावांची खेळी केली होती. यात त्याने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले होते.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने दिलेल्या २०५ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. नितीश राणाने १८ तर शुबमन गिलने २१ धावांची खेळी केली होती. तसेच राहुल त्रिपाठीने २५ धावांचे योगदान दिले होते. कर्णधार ओएन मॉर्गनने २९ धावा केल्या. तसेच शकीब अल हसनने २६ तर रसलने ३१ धावांचे योगदान दिले होते. २० षटक अखेर कोलकाता नाईट रायडर्स संघाला १६६ धावा करण्यात यश आले होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने हा सामना ३८ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
शेतकऱ्याचा मुलगा, ज्याने पदार्पणात केला अर्धशतकवीर अगरवालचा अडथळा दूर; वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी
कोरोना रुग्णांवर ७ महिन्याची गर्भवती महिला डॉक्टरला उपचार करताना पाहून सेहवागने केले ‘हे’ आवाहन