भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa) भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ निवड समितीने जाहीर केलेल्या या संघात १८ जणांना संधी देण्यात आली. त्याचवेळी, निवड समितीने एक मोठा निर्णय घेत अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला कसोटी संघाच्या उपकर्णधार पदावरून दूर करत रोहित शर्माला उपकर्णधारपद देऊ केले. निवड समितीच्या या निर्णयामागील कारणे आपण जाणून घेऊयात.
भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa) भारतीय संघाची घोषणा केली गेली. १८ सदस्यीय संघासह ४ राखीव खेळाडूदेखील या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, संघाचा उपकर्णधार म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma Test Vice Captain) प्रथमच जबाबदारी सांभाळेल. मागील तीन वर्षापासून भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या रहाणेला या पदावरून हटवण्याचा निर्णय निवड समितीने अचानक घेतलेला नाही.
सातत्याने ठरतोय अपयशी
अजिंक्य रहाणे संघाच्या सर्वात वरिष्ठ खेळाडूंपैकी एक मानला जातो. मात्र त्याच्या लौकिकास साजेशी कामगिरी तो मागील बऱ्याच काळापासून करू शकला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न कसोटीत शतक (Ajinkya Rahane Melbourne Century) झळकावल्यानंतर त्याची बॅट थंडावली आहे. इंग्लंड विरुद्धची मायदेशातील मालिका तसेच इंग्लंड दौऱ्यावर देखील तो धावा करण्यात अपयशी ठरला होता. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याला अर्धशतकही ठोकता आले नव्हते.
संघातील जागेवर प्रश्नचिन्ह
खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे रहाणेच्या संघातील जागेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने दोन्ही कसोटीत शानदार फलंदाजी करून मधल्या फळीतील जागेवर आपला दावा सांगितला. (Shreyas Iyer Debute) तसेच, रिषभ पंत याचे पुनरागमन झाल्यास भारताची मधली फळी आणखी सुदृढ होईल. शुबमन गिल व सुर्यकुमार यादव यांसारखे नवे खेळाडू सातत्याने भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये (Indian Dressing Room) उपलब्ध आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अरे काय चाललंय! बलाढ्य इंग्लंड संघाचे ऍशेसमध्ये लज्जास्पद प्रदर्शन, ६ फलंदाज एकेरी धावेवर बाद
रोहित वनडे संघाचा कर्णधार झाल्यानंतर उपकर्णधारपद रिक्त, ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रमुख दावेदार