इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या उर्वरित सामन्यांना येत्या रविवारपासून म्हणजेच १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वच संघांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. खरंतर कोरोना संक्रमणामुळे आयपीएल २०२१ हंगाम २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर उर्वरित ३१ सामने संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे घेण्याचे निश्चित झाले. आता या उर्वरित हंगामाला सुरुवात होत आहे.
दरम्यान, आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सुरु होण्यापूर्वी अनेक संघांना मोठे धक्के बसले. त्यांचे महत्त्वाच्या खेळाडूंनी विविध कारणांनी दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतली. त्यामुळे संघांना माघार घेतलेल्या खेळाडूंचे बदली खेळाडू शोधावे लागले. त्यामुळे अनेक संघांमध्ये नवीन नावं सामील झाली तर काही नावं गायब झाली. आयपीएल २०२१ मध्ये सहभागी असलेल्या ८ संघांपैकी केवळ चेन्नई सुपर किंग्स हा एकमेव असा संघ आहे, ज्यांचा एकही खेळाडू दुसऱ्या टप्प्यात बदलण्यात आला नाही. अन्य सर्व संघांमध्ये किमान एक तरी खेळाडू बदली खेळाडू म्हणून सामील झाला.
यंदा दुसऱ्या टप्प्यातून ऑस्ट्रेलियाच्या एकूण ७ खेळाडूंनी नाव मागे घेतले आहे, तर इंग्लंडच्या ६ खेळाडूंनी माघार घेतली आहे. यातील काही खेळाडू दुखापतीमुळे, तर काही खेळाडू वैयक्तिक कारणामुळे दुसऱ्या टप्प्याचा भाग होणार नाहीत.
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक बदल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाले आहेत. त्यांनी ५ खेळाडूंना बदली खेळाडू म्हणून सामील केले आहे. तर राजस्थान रॉयल्सने ४ बदल केले आहेत. तसेच पंजाब किंग्सने ३ बदल केले आहेत. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सने २ बदल केले आहेत. तर, कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी १ बदल केला आहे.
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी बदली खेळाडूंची यादी
(पूर्वीचा खेळाडू – बदली खेळाडू (संघ))
एम सिद्धार्थ – कुलवंत खेजरोलिया (दिल्ली कॅपिटल्स)
ख्रिस वोक्स – बेन ड्वारशूइस (दिल्ली कॅपिटल्स)
झाय रिचर्डसन – आदिल राशिद (पंजाब किंग्स)
रिली मेरेडिथ – नॅथन एलिस (पंजाब किंग्स)
डेविड मलान – एडेन मार्करम (पंजाब किंग्स)
जोस बटलर – एविन लुईस (राजस्थान रॉयल्स)
बेन स्टोक्स – ओशान थॉमस (राजस्थान रॉयल्स)
जोफ्रा आर्चर – ग्लेन फिलिप्स (राजस्थान रॉयल्स)
अँड्र्यू टाय – ताब्राईज शम्सी (राजस्थान रॉयल्स)
ऍडम झम्पा – वनिंदू हसरंगा (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
केन रिचर्डसन – जॉर्ज गार्टन (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
फिन ऍलेन – टीम डेविड (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
डॅनिएल सॅम्स – दुश्मंता चमिरा (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
वॉशिंग्टन सुंदर – आकाश दीप (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
मोहिसन खान – रुश कलारिया (मुंबई इंडियन्स)
जॉनी बेअरस्टो – शेर्फेन रुदरफोर्ड (सनरायझर्स हैदराबाद)
पॅट कमिन्स – टीम साऊथी (कोलकाता नाईट रायडर्स)
महत्त्वाच्या बातम्या –
सर्वाधिक धावा, सर्वात लांब षटकार, सर्वाधिक विकेट्स, पाहा आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्याचा लेखाजोखा
सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारतीय महिला संघाचा पराभव, पूजा वस्त्राकरची झुंज अपयशी