---Advertisement---

या दिग्गज क्रिकेटपटूच्या निधनाची पसरली खोटी बातमी; स्वत: क्रिकेटपटूने केला खूलासा

On: सोमवार, मे 27, 2019 4:00 PM
---Advertisement---

सोमवारी(27 मे) सकाळी श्रीलंकेचा माजी दिग्गज फलंदाज सनथ जयसुर्याच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. पण खुद्द जयसुर्यानेच या बातमीचे खंडन करत ही बातमी खोटी असल्याचे ट्विट करत सांगितले आहे. तसेच तो ठिक असल्याचेही म्हटले आहे.

जयसुर्याच्या निधनाबाबत व्हायरल झालेल्या बातमीत कॅनडामध्ये टोरोंटो येथे 20 मे ला एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले होते.

पण ही बातमी व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच जयसुर्याने या बातमीचे खंडन करत ट्विट केले की ‘कृपया खोट्या बातमीचे खंडन करा. माझे आरोग्य चांगले आहे. मी श्रीलंकेत असून मी नजीकच्या काळात कॅनडाला गेलेलो नाही. कृपाकरुन खोटी बातमी पसरवू नका.’

https://twitter.com/Sanath07/status/1130789245457555456

जयसुर्याच्या निधनाच्या बातमीबद्दल भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विननेही ट्विट करत ही बातमी खरी आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता. पण काही वेळातच जयसुर्याच्या आत्मचरित्राचे लेखक चंद्रेश नारायण यांनी त्याला ही बातमी खोटी असल्याचे सांगितले. यावर अश्विनने उत्तर देत म्हटले आहे की ‘मला वाटलेच होते की ही बातमी खोटी असणार.’

Screengrab: Twitter/ashwinravi99

1996 च्या विश्वचषक विजयात श्रीलंका संघाकडून महत्त्वाची भूमीका निभावणाऱ्या जयसुर्याने आत्तापर्यंत 110 कसोटी, 445 वनडे आणि 31 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने 6973 धावा कसोटीत, 13430 धावा वनडेत तर टी20 मध्ये 629 धावा केल्या आहेत. याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 पेक्षा अधिक विकेट्सही घेतल्या आहेत.

नॅथन मॅक्यूलमच्या निधनाबाबतही पसरली होती अफवा – 

मागीलवर्षी न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू नॅथम मॅक्यूलमच्या निधनाबाबतही अफवा पसरली होती. त्यावेळीही लगेचच नॅथनने आपण जिवंत आहोत, असा खुलासा करत ही बातमी खोटी असल्याचे सांगितले होते.

तसेच त्याचा लहान भाऊ ब्रेंडन मॅक्यूलमनेही ही बातमी खोटी असल्याचे सांगत ही अफवा पसरवणाऱ्याला मी शोधून काढेल असे म्हटले होते.

https://twitter.com/MccullumNathan/status/1068797155685523456

https://twitter.com/Bazmccullum/status/1068854050106601472

 

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

२०१९ विश्वचषकासाठी संधी मिळालेल्या ‘त्या’ खेळाडूचे शार्दुल ठाकुरने वाचवले होते करियर

हिटमॅन रोहित शर्माकडून पंड्या, धवन क्लिन बोल्ड, पहा व्हीडिओ

विश्वचषकात हा संघ ठरू शकतो ‘सरप्राईज पॅकेज’, सचिन तेंडुलकरने व्यक्त केले मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment