ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गेल्या चार दिवसांपासून तिसऱ्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या या सामन्याच्या पाचव्या दिवशी (११ जानेवारी) भारतीय संघाला ३०० हून अधिक धावांचा डोंगर पार करायचा होता. चौथ्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज फलंदाजी करत ४०७ धावांवर डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात सलामीवीरांच्या विकेट गमावत भारतीय संघाने चौथ्या दिवसाखेर २ बाद ९८ धावा फलकावर नोंदवल्या होत्या.
यानंतर पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी खळबळजनक दावा केला होता. “भारतीय संघापुढे ३१० धावांचे भलेमोठे आव्हान आहे. पण ईमानदारीने सांगायचे झाले तर, भारतीय संघ त्यांच्या दुसऱ्या डावात २०० धावाही करु शकणार नाही”, असे त्यांनी म्हटले होते.
पाँटिंग यांच्या म्हणण्यानुसार भारतीय संघाने पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाच कर्णधार अजिंक्य रहाणेची महत्त्वपुर्ण विकेट गमावली. परंतु पुढे फलंदाजीला आलेल्या रिषभ पंतने कसोटीपटू चेतेश्वर पुजारासोबत शतकी भागिदारी करत पाँटिंगला तोंडघशी पाडले. पंतने धडाकेबाज सुरुवात करत लंच ब्रेकपर्यंत ७३ धावांची आतिशी खेळी केली होती. सोबतच पुजारानेही ४० धावांचे योगदान दिले होते.
310 ahead at the moment, but I honestly think India won't make 200 in the second innings #AskRicky https://t.co/jLh01HCV7P
— 7Cricket (@7Cricket) January 10, 2021
हे पाहिल्यानंतर माजी भारतीय विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग याने पाँटिंगचा चिमटा काढला आहे. सेहवागने आयपीएलमधील पंत आणि पाँटिंगचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. पाँटिंग सामन्यादरम्यान समालोचकांशी बोलत असताना पंतने त्यांची खोड काढली होती. तेव्हा पंतचा तो फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. सेहवागने हाच फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे पाँटिंगला टोमणा मारला आहे.
https://t.co/Z8zqkzZGNe pic.twitter.com/hKPAa3FLoc
— Virender Sehwag (@virendersehwag) January 11, 2021
तसेच पाँटिंग यांनीही ट्विट करत आपला बचाव केला. “मी पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला भविष्यवाणी केली होती की भारतीय संघ दुसऱ्या डावात २०० धावांही करु शकणार नाही. पण माझ्या अपेक्षेप्रमाणे खेळपट्टी खराब झाली नाही. तसेच रिषभ पंत याचा पुरेपुर फायदा घेत आहे. खरा सामना आता सुरु झाला आहे,” असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
So much for the prediction of India scoring under 200, this pitch hasn't deteriorated anywhere near what I was expecting. Like the way Rishabh Pant's playing, it's the perfect approach to take in these conditions. And now it's game on #AUSvIND
— Ricky Ponting AO (@RickyPonting) January 11, 2021
पुढे दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने ९७ धावांवर पंतला माघारी धाडले. तर वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडनेही पुजाराचा त्रिफळा उडवला. त्यामुळे ७७ धावांवर भारताने पुजाराच्या रुपात पाचवी विकेट गमावली. परंतु, हनुमा विहारी आणि आर अश्विन या भारतीय खेळाडूंनी बचावात्मक फलंदाजी करत २०० नव्हे तर ३०० धावांचाही आकडा पार करत पाँटिंगला सणसणीत चपराक लगावली आहे.
भारतीय संघाने पाचव्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत १२७ षटकात ५ बाद ३२० धावा केल्या आहेत. आता भारताला विजयासाठी ८७ धावांची आवश्यकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
खणखणीत चौकार मारत पुजाराने केल्या कसोटी कारकिर्दीतील ६००० धावा पूर्ण, ठरला अकरावा भारतीय
कसोटी सामन्याच्या शेवटी विरोधी संघाला धू धू धुणारे भारतीय विकेटकिपर, ‘ही’ आहेत नावे