ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या ऍशेस मालिका (ashes series) खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ९ विकेट्स राखून विजय मिळवला. आता उभय संघातील दुसरा कसोटी सामना एडिलेडमध्ये १६ डिसेंबर पासून खेळला जाणार आहे. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलिया संघाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पॉंटिंग (ricky ponting) याने इंग्लंड संघासाठी एक चेतावणी दिली आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात विजय मिळवून ऍशेस मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अशात रिकी पॉंटिंगच्या मते, एडिलेडमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात, जर इंग्लंडने पुनरागन केले नाही तर त्यांना मालिकेत ५-० अशा मोठ्या फरकाणे पराभव मिळू शकतो.
ऑस्ट्रेलियातील माध्यमांशी बोलताना पॉंटिंग म्हणाला की, एडिलेडमधील परिस्थिती इंग्लंड संघासाठी अनुकूल असेल आणि त्यामुळे त्यांनी याठिकाणी चांगले प्रदर्शन केले पाहिजे. पॉंटिंगच्या मते त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या सामन्यातील परिस्थिती ऑस्ट्रेलिया संघासाठी अनुकूल असू शकते. तो म्हणाला, “या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी परिस्थिती अजूनच चांगली होईल. ब्रिस्बेनमधील परिस्थिती इंग्लंडप्रमाणे होती. त्या खेळपट्टीवर जास्त गती आणि बाउंस होता. जोपर्यंत गोलंदाजीचा प्रश्न आहे, तर त्यांना पूर्ण मालिकेदरम्यान जास्त मदत मिळणार नाही.”
रिकी पॉटिंगने या गोष्टीची आठवण देखील करून दिली की, यापूर्वी जेव्हा दोन्ही संघात एडिलेडमध्ये शेवटचा डे-नाइट कसोटी सामना खेळला गेला होता, तेव्हा जेम्स अँडरसनच्या जबरदस्त प्रदर्शनच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला सामन्याच्या तिसऱ्या डावात अवघ्या १३८ धावांवर गुंडाळले होते. परंतु इंग्लंडने या सामन्यात १२० धावांनी पराभव पत्करला होता.
दरम्यान, इंग्लंड संघाचे दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे पहिल्या सामन्यात विश्रांतीवर होते. एडिलेडमधील दुसऱ्या सामन्यात ते उपस्थित असतील आणि इंग्लंड संघ त्यांच्या प्रदर्शनावर बऱ्यापैकी अवलंबून असेल.
महत्वाच्या बातम्या –
“… म्हणून अश्विनपेक्षा जडेजाला जास्त महत्व मिळते”
‘तो’ सल्ला न मानणे हार्दिकला पडले महागात! आज मोजतोय किंमत