दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाने (India tour of South Africa) जोरदार सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ११३ धावांनी विजय मिळवला आहे. यासह ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघातील यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) यांनी मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. दरम्यान या विक्रमी कामगिरीनंतर जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये २०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. असा कारनामा करणारा तो ११ वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर रिषभ पंतने एमएस धोनीचा विक्रम मोडून काढला आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वात जलद १०० बळी घेणारा यष्टिरक्षक ठरला आहे. या विक्रमी कामगिरीनंतर दोघांनी केक कापून जोरदार सेलिब्रेशन केले. (Mohammad Shami and Rishabh Pant celebration)
असा कारनामा करणारा ठरला तिसरा गोलंदाज
मोहम्मद शमी ५५ कसोटी सामन्यांमध्ये २०० गडी बाद करणारा तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे. त्याच्यापूर्वी महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी ५० कसोटी सामन्यांमध्ये २०० गडी बाद करण्याचा कारनामा केला होता, तर जवागल श्रीनाथ यांनी ५४ कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला होता. मोहम्मद शमीनंतर झहीर खान आणि ईशांत शर्मा ६३ कसोटी सामन्यांमध्ये २०० गडी बाद करत संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहेत.
200 Test wickets ✅
100 dismissals as wicket-keeper ✅Special milestones call for a celebration 🍰🙌#TeamIndia | #SAvIND | @MdShami11 | @RishabhPant17 pic.twitter.com/lj8CZHMaBs
— BCCI (@BCCI) December 30, 2021
रिषभ पंतचा मोठा कारनामा
रिषभ पंतने यष्टीमागे १०० बळी घेण्याचा कारनामा अवघ्या २६ व्या कसोटी सामन्यात केला आहे, तर एमएस धोनीने हा कारनामा ३६ व्या कसोटी सामन्यात केला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक कसोटीत यष्टीमागे सर्वात जलद १०० विकेट्स घेण्याच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. त्याने हा कारनामा अवघ्या २२ व्या सामन्यात केला होता.
या कामगिरीसह रिषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये १०० बळी घेणारा ६ वा भारतीय यष्टिरक्षक ठरला आहे.त्याच्याआधी एमएस धोनी( Ms dhoni) , सय्यद किरमाणी, किरण मोरे, नयन मोंगिया आणि वृद्धिमान साहा यांनी शतक पूर्ण करण्याचा कारनामा केला आहे. एमएस धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी यष्टिरक्षक आहे. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये २९४ बळींची नोंद आहे.
महत्वाच्या बातम्या :
केएल राहुलने सांगितली राज की बात! फलंदाजीत ‘हा’ बदल केल्याने मिळाले यश
तब्बल १ तास स्टीव्ह स्मिथ अडकला लिफ्टमध्ये, लॅब्युशेनने फटीतून दिले खायला, पाहा व्हिडिओ
हे नक्की पाहा :