भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने तुफानी शैलीत फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. आपल्या डावाचे शतकात रूपांतर करण्यात तो यशस्वी होऊ शकला नसला तरी, त्याने माजी कर्णधार एमएस धोनीचा कसोटी क्रिकेटमधील एक विक्रम मोडीत काढला.
पहिल्या दिवसाअखेर भारताचा डाव संकटात सापडला होता. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा संघाने 86 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. मात्र, दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला पंतने शुबमन गिलसह संघाला मजबूत स्थितीत आणले. पंतने 59 चेंडूंचा सामना करत 60 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. वेगवान धावा करण्याच्या प्रयत्न तो बाद झाला.
या खेळी दरम्यान पंतने धोनीचा एक विक्रम मोडला. पंत हा भारतासाठी कसोटी सामन्यांमध्ये 100+ च्या स्ट्राइक रेटसह सर्वाधिक वेळा 50+ धावा करणारा यष्टिरक्षक फलंदाज बनला आहे. त्याने पाचव्यांदा ही कामगिरी केली. याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. ज्याने आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत 4 वेळा हा पराक्रम केलेला. पंतने आपल्या 37 व्या कसोटी सामन्यातच धोनीचा हा महान विक्रम मोडला. आता त्याची नजर ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्टच्या विश्वविक्रमावर आहे. गिलख्रिस्टने आपल्या कारकिर्दीत 8 वेळा अशी कामगिरी केली होती.
तिसऱ्या कसोटीचा विचार केल्यास भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी उत्कृष्ट खेळ दाखवताना आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला दुसऱ्या डावात पुन्हा एकदा रोखण्याचे काम केले. रवींद्र जडेजा याने चार व अश्विनी याने तीन बळी घेत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपले पर्यंत त्यांचे नऊ गडी बाद केले होते. सध्या न्यूझीलंडकडे 143 धावांची आघाडी असून, भारतीय संघ तिसऱ्या दिवशी त्यांना झटपट बाद करण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंडने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत, यापूर्वीच मालिका आपल्या नावे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; पंजाब किंग्ज बनणार सर्वात मजबूत संघ, नवीन प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य!
रिषभ पंतवर भडकला रोहित शर्मा, VIDEO होतोय जोरदार व्हायरल
IND vs NZ; मुंबई कसोटीत भारताचे वर्चस्व! दुसऱ्याच दिवशी न्यूझीलंडचे 9 गडी तंबूत