---Advertisement---

यष्टीरक्षक पंतचा सल्ला आला कामी, बांगलादेशच्या कर्णधाराला अश्विनने असे फसवले जाळ्यात

ashwin pant video
---Advertisement---

जेव्हा कोणत्याही संघाकडे यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत सारखा खेळाडू असतो तेव्हा तो, आपल्या नाविन्यपूर्ण शब्दांनी सहकाऱ्यांना सतत प्रेरित करतो, तसेच त्यांची करमणूक करत असतो. मात्र, तो फक्त मजा करत नाही तर आपल्या खेळाच्या समजाने कर्णधार आणि गोलंदाजांना मदत करतो. रविचंद्रन अश्विनने कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याच्या या कौशल्याचा पुरेपूर वापर करून घेतला.

बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शांतो आणि मोमिनुल हक यांनी सुरुवातीलाच दोन्ही सलामीवीर गमावल्यानंतर चांगली फलंदाजी केली. त्यांनी 50 धावांची भागीदारी केली. लंच ब्रेकनंतर दुसऱ्या सत्रात ते अश्विनविरुद्ध सहज खेळताना दिसत होते. अश्विनने 29व्या षटकात शांतोला चार चेंडू टाकले. त्यापैकी कोणत्याही चेंडूवर त्याला लाईन लेंथ राखता आली नाही. त्याला बॅटरला स्टंपसमोर खेळायला लावणे आवश्यक होते. चौथ्या चेंडूनंतर पंतने त्याला यष्टीमागून नेमके हेच सांगितले.

पंत म्हणाला, “थोडा आगे डालना पडेगा ऐश भाई,” पंतने सांगितलेली गोष्ट अश्विन याने जशीच्या तशी अंमलात आणली.‌ त्याने एका कोनातून स्लाइडर चेंडू टाकला. शांतोने तो चेंडू चुकीच्या लाईनममध्ये खेळला आणि चेंडू त्याच्या पॅडला स्टंपसमोर आदळला. शांतोने मोमिनुलशी थोडक्यात चर्चा केल्यानंतर आश्चर्यकारकपणे डीआरएसची मागणी केली. रिप्लेमध्ये तो स्पष्टपणे बाद असल्याचे दिसत असल्याने, शांतोला पॅव्हेलियनमध्ये परत जावे लागले. त्याने 31 धावांचे योगदान दिले. तसेच, मोमीनुलसह 51 धावांची भागीदारी केली.

मोमिनुल 40 धावांवर आणि मुशफिकर रहीम सहा धावांवर फलंदाजी करत असताना काळ्या ढगांमुळे दृश्यमानता कठीण झाली. त्यामुळे पंचांनी दुसऱ्या सत्राचा खेळ थांबवला. त्यावेळी बांगलादेशची स्थिती 107/3 अशी होती. खेळाडू मैदानातून बाहेर पडताच ग्रीन पार्क स्टेडियमवर जोरदार पाऊस झाला. दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर असलेल्या भारताने ढगाळ वातावरणात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज आकाश दीपने खेळाच्या पहिल्या तासात दोन विकेट्स घेत कर्णधार रोहित शर्माचा निर्णय योग्य ठरवला.

महत्त्वाच्या बातम्या-

“गौतम गंभीरचा खरा चेहरा अजून समोर आलेला नाही”, बांगलादेशी खेळाडूचं वादग्रस्त वक्तव्य
फक्त 264 धावा नाही, तर रोहितचा ‘हा’ रेकाॅर्ड मोडीत काढणे अशक्य!
कोण आहे तो फलंदाज…ज्यानं वयाच्या 25व्या वर्षी केली डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी! दोन्ही हातांनी करतो गोलंदाजी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---