---Advertisement---

ब्रॅड हॉगच्या मते ‘हा’ विकेटकिपर आहे धोनीचा उत्तराधिकारी

On: शुक्रवार, जुलै 3, 2020 3:46 PM
---Advertisement---

२०१९ च्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) क्रिकेटच्या मैदानावर दिसला नाही. या काळात महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी कोण? ही चर्चा वारंवार होत राहिली. मर्यादित षटकांच्या सामन्यात रिषभ पंत (Rishabh Pant) आणि के एल राहुल (K L Rahul) यांना आपण विकेटकिपिंग करताना पाहिले आहे.

रिषभ पंत दुखापतग्रस्त झाल्यानंतर के एल राहुलने मिळालेली जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. काही समीक्षकांनी रिषभ पंतला धोनीचा वारसदार म्हणून घोषितच केले होते परंतु राहुलने आपल्या फलंदाजी आणि विकेट किपिंगच्या जोरावर रिषभ पंतसाठी स्पर्धा उभी केली. त्यामुळे या गोष्टीची चर्चा वारंवार होत असते. माजी ऑस्ट्रेलियन चायनामन गोलंदाज ब्रॅड हॉग यांनेदेखील आपले मत व्यक्त केले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज फिरकीपटूच्या म्हणण्यानुसार,” राहुल नाहीतर रिषभ पंत हाच धोनीचा उत्तराधिकारी राहील. भविष्यातील भारतीय संघाची गरज पाहता रिषभ हाच या जागेसाठी सर्वोत्तम पर्याय आहे परंतु त्याला आपली निर्णय क्षमता वाढवावी लागेल.”

हॉगने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, ” कसोटी सामन्यात विकेटकिपर म्हणून रिषभ पंत माझी पहिली पसंत राहील. साहा सध्या उत्तम कामगिरी करत आहे परंतु तो आता वयाच्या मानाने आपली कारकीर्द जास्त दूरपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. सध्या राहुल हा मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी योग्य आहे पण पुढील दोन-तीन वर्षात पंत तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताचा यष्टीरक्षक असेल. रिषभला, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्याप्रमाणे मेंटल कोचची आवश्यकता आहे, जेणेकरून तो त्याची निर्णयक्षमता वाढवू शकेल.”

राहुल विषयी बोलताना हॉग म्हणाला, “राहुल सध्या मर्यादित षटकांच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करत आहे पण तो कसोटी सामन्यात यष्टीरक्षक असू नये. त्याला प्रथमश्रेणी सामन्यात यष्टीरक्षणाचा अनुभव नाही आणि याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर होऊ शकतो.”

हॉगच्या नुसार, ” वर्कलोड मॅनेजमेंट हीसुद्धा महत्त्वाची बाब आहे. सध्या साहा कसोटीत कीपिंग करत असला तरी पंत हा शानदार आहे. तो साहाच्या तुलनेत अधिक आक्रमक आहे. भारताचे पहिले पाच फलंदाज कायम चांगली कामगिरी करतात तेव्हा सहाव्या सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा फलंदाज आक्रमक हवा, ज्यामुळे गोलंदाजांना विरुद्ध संघाचे बळी घेण्यास जास्त वेळ मिळेल.”

रिषभ पंत याने इंग्लंडमध्ये कसोटीत शतक झळकावणारा पहिला भारतीय विकेटकीपर होण्याचा मान मिळवला आहे तर राहुलने वन-डे आणि‌ टी२० मध्ये आपल्या सर्वांगसुंदर खेळाने जागा पक्की केली आहे.

ट्रेंडिंग घडामोडी –

कोरोना इफेक्ट: क्रिकेटमध्ये विकेट घेतली रे घेतली की असं करायचं सेलिब्रेशन, पहा व्हिडिओ

आयपीएल नाही झाली म्हणून काय झालं, ऑगस्टमध्ये होणार ही मोठी प्रीमीयर लीग

वानखेडेवर झालेल्या पराभवामुळे संगकाराची झाली तब्बल ५ तास चौकशी, नाराज संगकारा…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---