रिषभ पंत कसोटीत पुन्हा एकदा नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी पंत 99 धावांवर बाद झाला. विल्यम ओ’रूर्कच्या चेंडूनं त्याच्या बॅटची कड चाटली आणि चेंडू स्टंपला जाऊन आदळला. पंतनं 105 चेंडूत 99 धावांची खेळी केली. यादरम्यान त्यानं 9 चौकार आणि 5 षटकार मारले.
रिषभ पंत कसोटीत नर्व्हस नाईन्टीजचा बळी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी तो अनेक वेळा कसोटीत 90 ते 100 धावांच्या दरम्यान बाद झाला आहे. पंत कसोटीत नर्व्हस नाईन्टीजमध्ये बाद होण्याची ही सातवी वेळ आहे. त्याची आजची ही खेळी अनेक अर्थांनी खास होती, कारण या कसोटीच्या पहिल्या डावात भारत अवघ्या 46 धावांवर ऑलआऊट झाला होता.
या कसोटीदरम्यान पंतच्या गुडघ्यालाही दुखापत झाली होती. यामुळे त्यानं तिसऱ्या दिवशी विकेटकीपिंगही केलं नाही. परंतु दुखापतग्रस्त असतानाही त्यानं फलंदाजीसाठी उतरून सरफराज खानसोबत मोठी भागीदारी केली आणि टीम इंडियाला संकटातून वाचवलं. त्याच्या या खेळीनं भारतीय संघाला डावाच्या पराभवापासून वाचवलं आहे.
रिषभ पंतनं सरफराज खानसोबत चौथ्या विकेटसाठी 177 धावांची भागीदारी केली. पंतचं 7वं कसोटी शतक अवघ्या 1 धावानं हुकलं. जर त्यानं हे शतक मारलं असतं, तर तो महेंद्रसिंह धोनीला मागे टाकून कसोटीत सर्वाधिक शतकं करणारा भारतीय यष्टिरक्षक फलंदाज ठरला असता.
रिषभ पंत आऊट होताच ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा आश्चर्यचकित झाले होते. त्यांच्या मागे बसलेल्या विराट कोहलीचाही यावर विश्वास बसत नव्हता. नॉन स्ट्रायकर एंडला उपस्थित असलेला केएल राहुलही खूप निराश झाला. यानंतर प्रेक्षकांनी पंतला स्टँडिंग ओव्हेशन दिलं. कसोटी क्रिकेटमध्ये पंत सातवेळा नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरला आहे. जर त्यानं या सर्व नर्व्हस नाइनटीजचे रुपांतर शतकामध्ये केले असते, तर त्याचे आतापर्यंत 13 कसोटी शतकं असते.
हेही वाचा –
सरफराजनं विचित्र पद्धतीनं उड्या मारून पंतला आऊट होण्यापासून रोखलं, मैदानातील मजेशीर VIDEO व्हायरल
शुबमन गिलच्या स्थानाला धोका? अष्टपैलू खेळाडूनं तिसऱ्या क्रमांकावर ठोकलं शतक
एमएस धोनीचा हा विक्रम मोडीत काढत रिषभ पंत बनला नंबर-1 कीपर, न्यूझीलंडचे धाबे दणाणले