चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघात चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज (१४ पेब्रुवारी) दुसरा दिवस आहे. या दिवसाच्या सुरुवातीला इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय खेळाडूंच्या पटापट विकेट्स घेतल्या. परिणामत ९५.५ षटकात भारताचा पहिला डाव ३२९ धावांवर संपुष्टात आला. यादरम्यान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने जबरदस्त फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले.
दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या पंतने आपल्या नाबाद ३३ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. एक बाजूला दिवसाच्या पहिल्याच षटकात २ विकेट्स गमावल्यानंतर पंतने आक्रमक फलंदाजी करत धावा जोडल्या. परंतु इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली स्टोनने डावातील ९६ व्या षटकात अखेरच्या २ विकेट्स घेत भारताचा पहिला डाव गुंडाळला.
त्यामुळे डावाखेर पंत ७७ चेंडूत ५८ धावांवर नाबाद राहिला. या खेळीदरम्यान त्याने ३ षटकार आणि ७ चौकार मारले. हे पंतचे कसोटी कारकिर्दीतील सहावे तर मागील ८ डावातील चौथे अर्धशतक ठरले.
ऑगस्ट २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या पंतने यापुर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेतील सिडनी कसोटीत त्याने ९७ धावांची आतिशी खेळी केली होती. तर पुढील ब्रिस्बेन कसोटीत नाबाद ८९ धावा केल्या होत्या. त्यानंतर मागील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने अवघ्या ९ धावांनी त्याचे शतक हुकले होते. अशाप्रकारे पंतने ४ अर्धशतके झळकावली आहेत.
Rishabh Pant's last few innings:
36
97
23
89*
91
11
50* — TodayHe's gone into his boundary-or-nothing mode while farming the strike with the tail .. #INDvENG
— Cricbuzz (@cricbuzz) February 14, 2021
कौतुकाची बाब अशी की, पंतला त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिली २ अर्धशतके करण्यासाठी जवळपास २२ डाव खेळावे लागले होते. मात्र पुढील अवघ्या ८ डावात त्याने ४ अर्धशतकांची नोंद केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsENG 2nd Test Live : टीम इंडियाचा पहिला डाव ३२९ धावांवर आटोपला, रिषभ पंतचे अर्धशतक पूर्ण
होय पक्काच! चेन्नई कसोटीत टीम इंडियाच्या ३०० पार धावा, मग विजय मिळणं निश्चित?
पती नंबर १..! पत्नीच्या बोटांमध्ये वेदना होत असल्याने रोहितने ‘असा’ केला उपचार, पाहा तो प्रेमळ क्षण