भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाचे कसोटी कर्णधारपद सोडले. विराट कोहली सध्या कोणत्याच प्रकारामध्ये संघाचा कर्णधार नाही. त्याच्या नावे कर्णधार म्हणुन मोठे विक्रम आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये तो इतर भारतीय कर्णधारांपेक्षा यशस्वी ठरला. कर्णधारपदावर असताना संघासोबतच कोहलीच्या नावावर अनेक वैयक्तिक विक्रमही जमा झाले. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात नवीन खेळाडूही आले. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपल यांच्या मते, भारतीय संघात कोहलीच्या नेतृत्वाखाली यष्टीरक्षक आणि महान फलंदाज रिषभ पंत हा चांगला खेळाडू म्हणून विकसीत झाला.
२०१७ मध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली रिषभ पंतने क्रिकेटच्या टी२० प्रकारापासुन सुरुवात करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एका वर्षात त्याने भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघात आपले स्थान निर्माण केले. रिषभ पंतला सुरुवातीला खराब फलंदाजीमुळे आणि यष्टीरक्षणामुळे चाहत्यांच्या टीकांना सामोर जावे लागले, तरीही भारतीय संघाने आणि कोहलीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आज तो भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे.
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपल यांनी पंतवर एवढा विश्वास ठेवल्याबद्दल भारतीय संघ आणि विराट कोहलीचे कौतुक केले आहे. चॅपल यांनी एका क्रीडा संकेतस्थळासाठी लिहलेल्या लेखात म्हटले आहे की, “कोहलीच्या नावे अनेक उपलब्धी आहेत. परंतु, त्याच्यासाठी यष्टिरक्षक आणि फलंदाज म्हणून रिषभ पंतच्या विकासापेक्षा मोठे काहीही नाही. कोहली आपल्या आवडीचा खेळाडू निवडण्यात यशस्वी राहिला आहे. त्याचे काही निर्णय धक्कादायक होते, परंतु पंतला त्याने दिलेला पाठिंबा हा मास्टर स्ट्रोक होता यात शंका नाही.”
मागील वर्षी रिषभ पंतने भारतीय संघात आपले स्थान पक्के केले. आता तो भारतीय संघाचा तिन्ही प्रकारांमधील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक बनला आहे. रिषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठा खेळाडू म्हणून उदयास येत आहे. त्याने गेल्यावर्षी सिडनी आणि ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८ कसोटी, २१ एकदिवसीय आणि ४१ टी २० सामने खेळले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
गंभीर सोबतच्या ‘त्या’ वादाबाबत १२ वर्षांनी बोलला अकमल; म्हणाला… (mahasports.in)
मॅक्सवेल असणार विराटचा उत्तराधिकारी? ‘ही’ नावेदेखील चर्चेत (mahasports.in)
जिगरबाज बेंगलोरचा केरला ब्लास्टर्सवर विजय (mahasports.in)