भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या बेंगळुरूमध्ये आहे, जिथे त्याने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर त्याचा भारत आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांची भेट घेतली. एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात सामील होण्यासाठी तो लवकरच दक्षिण आफ्रिकेला (दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत) रवाना होईल. दोन्ही संघांना 19 जानेवारीपासून एकमेकांविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.
सूर्यकुमार यादवने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून रोहित शर्मासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर रोहितची पत्नी रितिका सजदेह हिने कमेंट केली आहे.
सूर्यकुमार यादवने रोहित शर्मासोबतचा फोटो शेअर करत, “हे ब्रो” असे कॅप्शन दिले आहे. मात्र, सूर्यकुमार यादवच्या या पोस्टवर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने कमेंट केली आहे, जी पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.
रोहित शर्मा मागील काही काळापासून बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. कारण, तो त्याच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून बरा होत आहे. दक्षिण आफ्रिका दौर्यापूर्वी तो जखमी झाला होता. अशा परिस्थितीत जेव्हा सूर्यकुमार यादव बंगळुरूमध्ये त्याला भेटला तेव्हा त्याने रोहितसोबतचा फोटो पोस्ट केला.
https://www.instagram.com/p/CYYm_ezL0lO/
या पोस्टवर कमेंट करताना रितिकाने लिहिले की, “त्याला माझ्या तर्फे मिठी मार.” रितिकाची ही कमेंट चाहत्यांना खूपच क्यूट वाटली. रितिकाच्या या कमेंटवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. चाहत्यांसोबतच सूर्यकुमार यादवनेही रितिकाच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे. हसण्याचे इमोजी शेअर करताना त्यानी लिहिले ‘दिली’!

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेबद्दल बोलताना, व्यवस्थापनाने रोहित शर्माच्या पुनरागमनासाठी घाई न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुखापतग्रस्त रोहितचा वनडे संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलची वनडे मालिकेसाठी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी जसप्रीत बुमराहची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. आयपीएल 2021 मध्ये आपल्या उत्तुंग प्रतिभेचे प्रदर्शन करणाऱ्या युवा ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर यांचा संघात समावेश करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
नामुष्कीजनक पराभवाचे कर्णधार राहुलने दिले ‘हे’ कारण; म्हणाला…
केवळ २२ वर्षीय गोलंदाजाने घेतला वनडे क्रिकेटमधून ‘ब्रेक’; बुमराहशी होते तुलना
याराना! दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी सूर्याने घेतली रोहितची भेट






