मागील महिन्यात 24 जुलैपासून सुरू झालेली देवधर ट्रॉफी 2023 स्पर्धा 3 ऑगस्ट रोजी समाप्त झाली. या स्पर्धेत एकापेक्षा एक युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. तसेच, निवडकर्त्यांचे लक्षही आपल्याकडे वेधले आहे. या यादीत युवा फलंदाज रियान पराग याच्या नावाचाही समावेश आहे. या 21 वर्षीय फलंदाजाने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये वादळी फलंदाजी करत साखळी फेरीच्या 4 सामन्यातच 259 धावांचा पाऊस पाडला आहे.
देवधर ट्रॉफीमधील आपला शानदार फॉर्म काय टाकला असताना त्यांनी नुकतीच एक प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने आपण विराट कोहली याला आपला आदर्श मानत असल्याचे म्हटले. तो म्हणाला,
“विराट नेहमीच माझा आदर्श राहिला आहे. तो असताना आदर्श म्हणून तुम्ही अन्य कोणाकडे पाहू शकत नाही. आमच्या पिढीने अनेक दिग्गज फलंदाज पाहिले आहेत. मात्र, विराट त्यांच्या सर्वांच्यात उजवा आहे.”
आयपीएल दरम्यान रियान हा विराटकडून काही टिप्स घेताना दिसला. विराटने देखील मैदानाबाहेरील गोष्टींपेक्षा मैदानावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्याला दिला होता.
देवधर ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत रियान पराग याने 4 सामन्यात 2 शतकांच्या मदतीने 259 धावा चोपल्या आहेत. विशेष म्हणजे, रियानने यादरम्यान 22 चौकार आणि सर्वाधिक 18 षटकारही मारले आहेत. तसेच, गोलंदाजी करताना त्याने 4 सामन्यात 9 विकेट्सही घेतल्या आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या इमर्जिंग एशिया कपमध्ये देखील गोलंदाजी तो चमकला होता. यावर्षी आयपीएलमध्ये त्याच्याकडून संघाला मोठी अपेक्षा असताना तो एकाही सामन्यात वीस धावांच्या पुढे जाऊ शकला नव्हता. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करतो.
(Riyan Parag Said Virat Kohli Is My Idol After Deodhar Trophy Fine Performance)
महत्त्वाच्या बातम्या-
देवधर ट्रॉफीत रियान पराग नावाचं वादळ! 259 धावा चोपत घेतल्या ‘एवढ्या’ विकेट्स
बिग ब्रेकिंग! क्रीडा मंत्री झालेल्या भारतीय खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती