---Advertisement---

या कारणामुळे आजचा दिवस रोहित शर्माच्या कारकिर्दीत सुवर्णाक्षरांनी लिहीला जाणार

On: मंगळवार, नोव्हेंबर 6, 2018 4:27 PM
---Advertisement---

लखनऊ। भारत विरुद्ध विंडीज संघात आज पहिला टी20 सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.

या सामन्यात जर रोहित शर्माने 11 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. तसेच तो भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकेल.

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत रोहित सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 85 सामन्यात 2092 धावा केल्या आहेत. तसेच या यादीत पहिल्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने 62 सामन्यात 2102 धावा केल्या आहेत.

याबरोबरच आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या जगातील एकूण फलंदाजांमध्ये विराट आणि रोहित अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. यामध्ये न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टीन गप्टील अव्वल क्रमांकावर आहे. गप्टीलने 75 सामन्यात 2271 धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर रोहित आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक शतके करणाराही फलंदाज आहे. त्याने 3 शतके केली आहेत. तसेच रोहितसह या यादीत न्यूझीलंडचा कॉलीन मुनरोही अव्वल क्रमांकावर आहे. त्यानेही आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 3 शतके केली आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज-

2271 धावा – मार्टीन गप्टील (75 सामने)

2190 धावा – शोएब मलिक (108 सामने)

2140 धावा – ब्रेंडन मॅक्यूलम (71 सामने)

2102 धावा – विराट कोहली (62 सामने)

2092 धावा – रोहित शर्मा (85 सामने)

महत्त्वाच्या बातम्या:

२०००सालापुर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले ६ खेळाडू आजही खेळतात क्रिकेट

५ वर्षांपुर्वी हाच दिवस होता सचिन- रोहितसाठी कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा क्षण

आणि त्याने वयाच्या ४१व्या वर्षी घेतली कसोटी क्रिकेटमध्ये विकेट

कसोटी क्रिकेटमध्ये आज इतिहास घडला, रंगना हेराथचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार

पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात खेळण्याचा अजिंक्य रहाणेने व्यक्त केला विश्वास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment