भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली आहे. परंतु सातत्याने चाहते रोहित शर्माकडे संघाचे कर्णधारपद सोपविण्याची मागणी करत आहेत. खरंतर अडीच वर्षांपेक्षा अधिक काळ झाला विराटच्या नेतृत्वात भारताला एकही मोठी ट्रॉफी जिंकता आलेली नाही, तर रोहितने भारतीय संघाला निदाहास ट्रॉफी आणि आशिया चषकात विजय मिळवून दिला आहे.
आयपीएलमध्ये रोहित (Rohit Sharma) आपल्या शानदार नेतृत्वासाठी ओळखला जातो. त्याने आयपीएलच्या ४ मोसमात विजेतेपद मिळवून दिले आहे. त्यामुळे जर काही काळानंतर संघ व्यवस्थापन मोठा निर्णय घेत मर्यादित षटकांच्या भारतीय संघाचे नेतृत्व रोहितकडे सोपविले तर भारतीय संघाच्या काही खेळाडूंचे भाग्य चमकू शकते.
या लेखात आपण भारतीय संघाच्या त्या ५ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना रोहित कर्णधार झाल्यानंतर फायदा होऊ शकतो.
रोहित कर्णधार झाल्यावर या ५ खेळाडूंना मिळणार फायदा- These 5 players will benefit when Rohit becomes the captain
१. रिषभ पंत
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) सुरुवातीपासूनच धोनीचा उत्तराधिकारी मानले जात आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळण्याची संधी मिळाली होती. यानंतर पंतला भारतीय संघाच्या १५ सदस्यांमध्ये स्थान मिळते. परंतु त्याला मर्यादित षटकांच्या संघात खेळण्याची संधी मिळत नाहीये.
न्यूझीलंड दौऱ्यात ५ टी२० व ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यात आली होती. त्यावेळी संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएल राहुलला (KL Rahul) संधी दिली होती. ज्याप्रकारे विराट (Virat Kohli) पंतच्या जागी राहुलला यष्टीरक्षणाची जबाबदारी देत आहे. ते पाहून लवकरच पंतला संघातून वगळण्याची शक्यता आहे. परंतु जर संघाचे नेतृत्व रोहितकडे सोपविले, तर रोहित नक्कीच पंतला संघात खेळण्याची संधी देऊ शकतो.
२. कृणाल पंड्या
भारतीय टी२० संघाचा मुख्य सदस्य कृणाल पंड्याचाही (Krunal Pandya) त्या खेळाडूंमध्ये समावेश आहे, ज्यांना रोहित संघाचा कर्णधार बनल्यानंतर फायदा होऊ शकतो. खरंतर पंड्या आयपीएल २०१६पासून आयपीएल फ्रंचायझी मुंबई इंडियन्स संघाबरोबर खेळत आहे. इतकेच नव्हे तर तो रोहितच्या सामना विजेता खेळाडूंमध्येही सामील आहे.
भारतीय टी२० संघाचा खास खेळाडू पंड्याला बांगलादेशविरुद्ध केलेल्या खराब कामगिरीनंतर टी२० संघातून वगळण्यात आले आहे. त्यानंतर आता जवळपास ६ महिने झाले आहेत त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
आता रोहितला मर्यादित षटकांचा कर्णधारपद सोपविले, तर रोहितच्या नेतृत्वात पंड्याला संधी मिळणे जवळपास निश्चित आहे. कारण संघाला विजय मिळवून देण्यासाठी पंड्याला कशाप्रकारे वापरायचे हे रोहितला माहिती आहे.
३. वॉशिंग्टन सुंदर
भारतीय संघाचा युवा फिरकीपटू गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) २०१७मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. परंतु आतापर्यंत सुंदरला आपली प्रतिभा दाखवण्यासाठी हवी तितकी संधी मिळाली नाही.
खरंतर विराटच्या नेतृत्वातील भारतीय संघात फिरकीपटू गोलंदाज म्हणून युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे गोलंदाज असतात. तसेच अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजालाही प्राधान्य दिले जाते.
परंतु जर रोहितला संघाचे कर्णधारपद सोपविले गेले, तर रोहित सुंदरला अधिक सामन्यात खेळवून आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी देऊ शकतो. आकडेवारीबद्दल बोलायचं झालं, तर सुंदरने २३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने १९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच २६ धावा केल्या आहेत.
सुंदर एक उत्कृष्ट फिरकीपटू गोलंदाज असून खालच्या फळीत चांगली कामगिरी करण्याचीही क्षमता ठेवतो.
४. सूर्याकुमार यादव
मुंबई क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्याकुमार यादवने (Suryakumar Yadav) मागील बऱ्याच काळापासून देशांतर्गत सामन्यांमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. परंतु त्याला आतापर्यंत एकदाही राष्ट्रीय संघात म्हणजेच भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. त्याने विजय हजारे, देवधर ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे.
विस्फोटक फलंदाज यादवला आतापर्यंत निवडकर्त्यांनी संधी दिलेली नाही. विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर यादवने आयपीएलच्या मागील काही मोसमात मुंबई इंडियन्सबरोबर करार केला आहे. यादवला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी दिली, तर तो भारताच्या मधल्या फळीत चांगली कामगिरी करू शकतो.
अशामध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, तर तो यादवला नक्कीच संधी देऊ शकतो. कारण तो आयपीएलमध्ये यादवचा कर्णधार आहे आणि त्याच्याबद्दल रोहितला अधिक माहिती आहे.
५. राहुल चहर
मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू गोलंदाज राहुल चहरचादेखील (Rahul Chahar) त्या खेळाडूंपैकी एक आहे, ज्यांना रोहित कर्णधार बनताच फायदा होवु शकतो. राहुलला आयपीएल २०१८ च्या लिलावात मुंबई इंडियन्सने आपल्या संघात सामील केले होते. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे.
वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी२० सामन्यात चहरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्याला खास कामगिरी करता आली नव्हती. त्या सामन्यात त्याने १ विकेट घेतली होती. तेव्हापासून त्याला संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सदस्य राहुलला रोहितचे कर्णधार बनताच फायदा होऊ शकतो. कारण रोहित आयपीएलमध्ये राहुलवर विश्वास ठेवतो आणि तो कर्णधाराने टाकलेला विश्वास सार्थ ठरविला. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १६ सामने खेळले असून त्यात त्याने १५ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख-
-‘या’ ५ भारतीय फलंदाजांनी घ्यायला पाहिजे कसोटीतून निवृत्ती, पुनरागमनाची शक्यता आहे खूप कमी
-‘या’ क्रिकेटपटूच्या वडिलांची अतिशय महागडी कार गेली चोरीला
-टी२०मध्ये शेवटचे षटक निर्धाव टाकणारे ४ गोलंदाज; एक नाव आहे भारतीय