वेस्ट इंडिजमध्ये (West indies) सुरू असलेल्या आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ (Icc Under 19 World Cup)स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने सलग चौथ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसरा सामना बुधवारी (२ फेब्रुवारी) भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Austrelia) या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ९६ धावांनी विजय मिळवला होता. परंतु अनेकांना माहीत नसेल, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कसोटी संघातील मुख्य फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हे दोघेही एकत्र १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा खेळले होते.
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २००६ स्पर्धा श्रीलंकेत पार पडली होती. या स्पर्धेत देखील भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक दिली होती. परंतु अंतिम फेरीत भारतीय संघाला पाकिस्तान संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेत चेतेश्वर पुजाराने भारतीय संघासाठी सलामीवीर फलंदाजाची भूमिका पार पाडली होती. इतकेच नव्हे तर, तो या स्पर्धेत भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने ६ डावात ११६ च्या सरासरीने ३४९ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि २ अर्धशतक झळकावले होते. त्याचा स्ट्राइक रेट ८२ चा होता.
या स्पर्धेत रोहित शर्माने मध्यक्रमातील फलंदाजाची भूमिका पार पाडली होती. त्याला ६ डावात ४१ च्या सरासरीने २०५ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ३ अर्धशतक झळकावले होते. तर एकही शतक झळकावता आले नव्हते. त्याचा स्ट्राइक रेट ७७ चा होता. तो स्ट्राइक रेटच्या बाबतीत देखील चेतेश्वर पुजारा पेक्षा मागे होता. तसेच वर्तमानात रोहित शर्मा हा वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत तीन दुहेरी शतक झळकावले आहेत. तर चेतेश्वर पुजाराला वनडे क्रिकेटमध्ये आपली छाप सोडता आली नाही.
चेतेश्वर पुजाराला भारतीय वनडे संघात पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. त्याने २०१३ आणि २०१४ दरम्यान भारतीय संघासाठी ५ वनडे सामने खेळले होते. यादरम्यान त्याने अवघ्या १० च्या सरासरीने ५१ धावा केल्या होत्या. २७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. तो सध्या भारतीय कसोटी संघातील मुख्य फलंदाज आहे. त्याने ९५ कसोटी सामन्यात ६७०० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १८ शतक आणि ३२ अर्धशतक झळकावले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
धोनीमुळे घडला ‘सलामीवीर’ रोहित, आता रोहितमुळे घडणार ‘हा’ फलंदाज; विंडीजविरुद्ध मिळणार नवी जबाबदारी
कॅरेबियन असूनही विवेकानंदांचे पुस्तक हाती घेत गेलने दाखवले भारतावरचे प्रेम, फोटो तुफान व्हायरल
धोनीचा अघोरी अवतार ठरतोय लक्षवेधी, ‘अथर्व: द ओरिजिन’चा अंगावर शहारे आणणारा टीझर पाहिलाय का?