लीड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारताचा डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर इंग्लंडने ४३२ धावा करत ३५४ धावांची आघाडी घेतली आहे. प्रत्युत्तरात भारतीय संघाला केएल राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला आहे. परंतु, रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करत भारताचा डाव सावरला. याबरोबरच त्याने या डावात षटकार मारताच मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
इंग्लंड संघाने पहिल्या डावात ३५४ धावांची आघाडी घेतली आहे. प्रत्युत्तरात भारतीय संघाला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. केएल राहुलला क्रेग ओवरटनने अवघ्या ८ धावांवर माघारी धाडले. परंतु, रोहित शर्माने १५६ चेंडूच ५९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १६ व्या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर अप्रतिम अप्पर कट शॉट खेळत डावातील पहिलाच षटकार लगावला.
यासह भारताचा हिटमॅन कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक षटकार मारणारा चौथा, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.
हिटमॅनचा मोठा विक्रम
भारतीय संघाचा हिटमॅन वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जातो. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये देखील त्याने आपली छाप सोडण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात एकमात्र षटकार मारताच तो भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा चौथा फलंदाज ठरला आहे. त्याने कपिल देव यांना मागे टाकले आहे.
त्याच्या नावे ६२ षटकारांची नोंद झाली आहे. या यादीत सर्वोच्च स्थानी वीरेंद्र सेहवाग आहे. सेहवागने ९० षटकार लगावले आहेत. तसेच दुसऱ्या स्थानी धोनी आहे, त्याने ७९ षटकार लगावले आहेत. तिसऱ्या स्थानी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याने ६९ षटकार मारले आहेत. तसेच आता चौथ्या क्रमांकावर ६२ षटकारांसह रोहित असून कपिल देव ६१ षटकारांसह पाचव्या क्रमांकावर आहेत.
तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित तिसऱ्या क्रमांकांवर पोहोचला आहे. त्याच्या नावे ४३९ षटकारांची नोंद झाली आहे. या यादीत सर्वोच्च स्थानी वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल आहे. गेलने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५५० षटकार मारले आहेत. तर दुसऱ्या स्थानी शाहिद आफ्रिदी आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४७६ षटकार मारले आहेत. या यादीत एमएस धोनीचा ही समावेश आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३५९ षटकार लगावले आहेत.(Rohit Sharma becomes 4 Indian score most sixes for India in test Cricket)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
ख्रिस गेल – ५५० षटकार
शाहिद आफ्रिदी – ४७६ षटकार
रोहित शर्मा – ४३९* षटकार
ब्रेंडन मॅक्क्युलम – ३९८ षटकार
एमएस धोनी – ३५९ षटकार
भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
वीरेंद्र सेहवाग – ९० षटकार
एमएस धोनी – ७८ षटकार
सचिन तेंडुलकर – ६९ षटकार
रोहित शर्मा – ६२ षटकार*
कपिल देव -६१ षटकार
महत्त्वाच्या बातम्या –
टेलरच्या दुकानात कामाला, पुढे रिक्षाचालक ते जगातील स्टार फलंदाज असा प्रवास करणारा तो
ब्रायन लारा होता त्याचे नेहमीचे गिऱ्हाईक, पण ब्रेट लीने त्याची जागा अक्षरशः खाल्ली
झहीर खानचा विराटसाठी खास ‘गुरुमंत्र’, बाजी पलटू शकते फक्त…