अहमदाबाद। वेस्ट इंडिजचा संघ फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज संघाला वनडे आणि टी२० मालिका खेळायची आहे. येत्या ६ फेब्रुवारीपासून वनडे मालिकेने वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये भारताचे नेतृत्त्व रोहित शर्मा (Rohit Sharma) सांभाळताना दिसणार आहे. रोहितला वनडे मालिकेदरम्यान एक खास विक्रम करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) मागे टाकण्याची संधी असणार आहे.
रोहित टाकू शकतो सचिनला मागे
वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सचिनला मागे टाकण्याची रोहितकडे संधी असणार आहे. सध्या या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आहे.
विराटने वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेत ३९ सामन्यांत ७२.०९ च्या सरासरीने २२३५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ९ शतकांचा समावेश आहे. या ९ शतकांसह तो एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकणाराही फलंदाज आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सचिन तेंडुलकरने ३९ सामन्यांत ५२.४३ च्या सरासरीने १५७३ धावा केल्या आहेत. यामध्ये सचिनच्या ४ शतकांचा आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. आता त्याला या विक्रमाच्या यादीत मागे टाकण्यासाठी रोहितला केवळ ५१ धावांची गरज आहे.
रोहितने सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये ३३ सामने खेळले असून ६०.९२ च्या सरासरीने १५२३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ३ शतकांचा आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.
अधिक वाचा – ‘कर्णधार’ रोहित भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेईल; विराटच्या बालपणीच्या प्रशिक्षकाने गायले गुणगान
विशेष म्हणजे रोहित केवळ धावांच्या बाबतीतच नाही, तर शतकांच्या बाबतीतही सचिनला मागे टाकू शकतो. वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराटच्या पाठोपाठ सचिनचा क्रमांक लागतो. पण, जर रोहितने आगामी वनडे मालिकेत २ शतके केली, तर तो या यादीत सचिनला मागे टाकू शकतो.
व्हिडिओ पाहा – वयाच्या ५ व्या वर्षी मॅक्यूलमला पाहून क्रिकेटकडे आकर्षित झालेला पुण्याचा ‘ऋतुराज’
वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
२२३५ धावा – विराट कोहली (३९ सामने)
१५७३ धावा – सचिन तेंडुलकर (३९ सामने)
१५२३ धावा – रोहित शर्मा (३३ सामने)
१३४८ धावा – राहुल द्रविड (४० सामने)
११४२ धावा – सौरव गांगुली (२७ सामने)
महत्त्वाच्या बातम्या –
शाहरुखने ‘या’ संघासाठी खेळण्याची व्यक्त केली इच्छा; म्हणाला…
‘दीपक चहर असेल मेगा लिलावात सर्वात महागडा भारतीय गोलंदाज”
युवराज सिंगचा विचित्र चेहऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, भज्जीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया