---Advertisement---

‘सलामीवीर’ रोहित शर्माचे द. आफ्रिकेविरुद्ध शानदार शतक पूर्ण…

On: बुधवार, ऑक्टोबर 2, 2019 1:43 PM
---Advertisement---

आजपासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात विशाखापट्टणम येथे पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे.

त्याने 153 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने त्याचे कसोटीतील चौथे शतक पूर्ण केले आहे. तसेच ही चारही शतके त्याने भारतात केली आहेत.

तसेच रोहित आज पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करत आहे. त्यामुळे कसोटी सलामीवीर म्हणून त्याचे हे पहिलेच शतक ठरले आहे.

रोहितला या सामन्यात मयंक अगरवालने चांगली साथ दिली आहे. मयंकनेही त्याचे अर्धशतक पूर्ण करताना रोहित बरोबर 54 षटकात नाबाद 178 धावांची भागीदारी रचली आहे.

या सामन्यात भारत विरुद्ध कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

कर्णधार कोहलीने केली गांगुलीच्या विक्रमाची बरोबरी, आता केवळ एमएस धोनी आहे पुढे

अर्धशतक करताच हिटमॅन रोहित शर्माचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश

जेव्हा विराट कोहली पत्रकारांना करतो ट्रोल, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment