---Advertisement---

ड्रेसिंग रुममध्ये इतका निराश का दिसत होता रोहित? व्हायरल VIDEO पाहून चाहतेही भावूक

---Advertisement---

मुंबई इंडियन्सचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा गेल्या काही सामन्यांपासून खराब फॉर्मशी झगडत आहे. ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेला मुंबईचा हा माजी कर्णधार सोमवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध केवळ 4 धावा करून डगआउटमध्ये परतला. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं रोहितला यष्टिरक्षक क्लॉसेनकडे झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

आता मुंबई इंडियन्सच्या इनिंगदरम्यानचा रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित खूपच निराश दिसत आहे. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा निराशेनं डोळ्यावर हात ठेवून आपलं डोकं हलवताना दिसला. रोहित शर्माची ही अवस्था पाहून चाहते भावूक झाले आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

 

रोहित शर्मानं आयपीएलच्या या हंगामाची सुरुवात दमदार केली होती. त्यानं पहिल्या 7 डावात 297 धावा केल्या होत्या. मात्र शेवटच्या पाच डावात त्याला केवळ 33 धावा करता आल्या आहेत. गेल्या पाच सामन्यातील त्याच्या धावसंख्येवर नजर टाकली तर त्या अनुक्रमे 4, 11, 4, 8, 6 एवढ्या आहेत. म्हणजे गेल्या पाच सामन्यांत त्यानं केवळ एकदाच दुहेरी धावसंख्या गाठली आहे. 2024 टी20 विश्वचषकापूर्वी रोहित शर्माचा हा खराब फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनू शकतो.

प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी त्यांच्या अधिकृत ‘X’ हँडलवर रोहित शर्माच्या फ्लॉप शोबद्दल बोलताना म्हटलं की, ही चिंतेची बाब आहे. त्यांनी पोस्ट केलं, “रोहित शर्माचा फॉर्म आता चिंतेचा विषय आहे. त्यानं पहिल्या सात डावात 297 धावा केल्या आणि पुढच्या पाच डावात केवळ 33 धावा केल्या. त्याला आयपीएलचा शेवट जोरात करण्याची गरज आहे.”

हैदराबादविरुद्ध जरी रोहित शर्मा फ्लॉप झाला असला, तरी सूर्यकुमार यादव (102*) च्या शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं 16 चेंडू बाकी असताना 7 गडी राखून विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 173 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, मुंबईनं हे लक्ष्य 17.2 षटकांत 3 गडी गमावून गाठलं.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएलमध्ये फाटलेल्या स्नायूंनी खेळतोय महेंद्रसिंह धोनी! डॉक्टरांनी दिल्या विश्रांतीच्या सक्त सूचना

सूर्यकुमार यादवचं शतक, प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबईनं केला हैदराबादचा खेळ खराब

वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदाच मॅच पाहायला आला ‘ज्युनियर बुमराह’, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---