रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्या जोडीने भारतीय संघाला सात महिन्यांच्या अंतरात आयसीसीच्या दोन स्पर्धेत अंतिम सामन्यात स्थान पटाकवले होते. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध फायलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण दुसरीकडे 2024 च्या टी20 विश्वचषकात अखेर रोहित-राहुलच्या जोडीला यश मिळाले. आता रोहितने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनही भावूकपणे लिहिले आहे. रोहितने सांगितले की, तो लहानपणापासून राहुल द्रविडला प्रेरणास्रोत मानत आहे. रोहित शर्माने टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती.
रोहित शर्माने लिहिले, “जसे हजारो आणि लाखो मुलांनी तुमच्याकडून प्रेरणा घेतली, मी देखील त्यांच्यापैकी एक आहे. पण मी खूप भाग्यवान आहे की मला तुमच्यासोबत जवळून काम करण्याची संधी मिळाली. तुम्ही या खेळातील महान व्यक्तींपैकी एक आहात. तुमची वैयक्तिक कामगिरी बाजूला ठेवून तुम्ही टीम इंडियामध्ये प्रशिक्षक म्हणून सामील झालात आणि आम्ही तुमच्याशी कोणत्याही प्रकारचा संकोच न करता बोलू शकलो, तुमची नम्रता ही तुम्हाला देवाकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे हे, या खेळावरील तुमचे प्रेम कमी झालेले नाही.”
View this post on Instagram
रोहित शर्माने आपल्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, त्याची पत्नी, रितिका सजदेहच्या मते, राहुल द्रविड हा रोहितच्या कामाच्या पत्नीसारखा आहे. रोहितने पुढे लिहिले, “मी तुझ्याकडून खूप काही शिकलो आहे आणि प्रत्येक क्षणाला खूप मिस करेन. माझी पत्नी तुला माझी कामाची पत्नी म्हणते आणि मी भाग्यवान आहे की हे सांगण्यास मला कोणताही संकोच वाटत नाही. राहुल भाई तुम्हाला माझे विश्वासू, प्रशिक्षक आणि मित्र, म्हणणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.
महत्तवाच्या बातम्या-
राहुल द्रविडला या आयपीएल संघाकडून मोठी ऑफर, ‘द वाॅल’ दिसणार नव्या भूमिकेत?
आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्काराची घोषणा, भारताच्या ‘या’ खेळाडूनं मारली बाजी
विजयानंतरही वाढली गिलची डोकेदुखी, संघात तीन खेळाडू दाखल, यांचा प्लेइंग इलेव्हनमधून होणार पत्ता कट