अखेर इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामाला विजेता संघ गवसला. मंगळवारी (१० नोव्हेंबर) दुबईमध्ये झालेल्या आयपीएल २०२०च्या अंतिम लढतीत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५ विकेट्सने स्वप्नभंग केला. यामुळे मुंबईने पाचव्यांदा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले. परंतु, हा सामना हिटमॅन रोहित शर्मासाठी कर्णधाराच्या रुपात पाचवा तर खेळाडूच्या रुपात सहावा अंतिम सामना होता.
आयपीएलच्या पहिल्या हंगामात डेक्कन चार्जर्स संघाकडून रोहितने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यापुढील हंगामात डेक्कन संघाने अंतिम सामन्यात धडक मारली होती आणि विजयही मिळवला. हा रोहितचा खेळाडू म्हणून आयपीएल कारकिर्दीतील पहिला अंतिम सामना होता. त्यानंतर २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या पाचही वर्षात रोहितने मुंबईने प्रतिनिधित्त्व करताना अंतिम सामना खेळला. या पाचही हंगामात तो अंतिम सामन्यात कर्णधार आणि खेळाडू म्हणून खेळला.
विशेष म्हणजे, रोहितने आजवर कर्णधार किंवा खेळाडू कोणत्याही भूमिकेत खेळलेल्या अंतिम सामन्यात संघाने विजय मिळवला आहे.
अंतिम सामन्यातील रोहितची आकडेवारी
आयपीएल २०२०च्या अंतिम सामन्यात रोहितने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने सलामीला फलंदाजीला येत केवळ ५१ चेंडूत ६८ धावा केल्या. दरम्यान त्याने ५ चौकार आणि ४ षटकारही लगावले. अशाप्रकारे अतिशय महत्त्वपुर्ण अशा अंतिम सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात रोहितने मोलाचा वाटा दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
अरर! अंतिम सामन्यात रोहितवर ओढवली बदली खेळाडूच्या हातून बाद होण्याची नामुष्की
संघासाठी मैदानावर बॅट घेऊन झुंजणारे महारथी ! ‘हे’ आहेत दिल्लीकडून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
रोहितमुळे सूर्यकुमारच्या आयपीएलचा शेवट खराब? ‘त्या’ एका चुकीमुळे विनाकारण गमावली विकेट
ट्रेंडिंग लेख-
चौकारांचा बादशाह ! आयपीएलच्या १३व्या हंगामात ‘या’ धुरंधराने ठोकलेत सर्वाधिक चौकार, पाहा आकडा
राजधानी एक्स्प्रेस सुसाट !! एक नजर दिल्ली संघाच्या आयपीएलच्या फायनलपर्यंतच्या प्रवासावर…