मंगळवारी (२० एप्रिल) पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा समन करावा लागला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने या सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला गंभीर दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. याबाबतची माहिती त्याने स्वत: दिली आहे.
या सामन्यातील दुसऱ्या डावात, मुंबई इंडियन्स संघाने दिलेल्या १३८ धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित दुखापतग्रस्त झाला होता. १३ व्या षटकात त्याच्या बोटाला दुखापत झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यांनतर तो मैदानाबाहेर गेला होता.त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधाराची भूमिका कायरन पोलार्डने पार पाडली होती.
सामन्यानंतर जेव्हा रोहितला दुखापतीबाबत प्रश्न विचारण्यात आला यावर रोहित शर्मा म्हणाला, “माझ्या बोटाला छोटीशी दुखापत झाली आहे. हे लवकरच ठीक होऊन जाईल.” अर्थातच रोहित पुढील सामन्यात खेळणार हे ठरल्यात जमा आहे.
तसेच तो पुढे म्हणाला की, “या सामन्यात तुम्हाला दिल्लीच्या गोलंदाजांना श्रेय द्यावे लागेल. त्यांनी आमच्या फलंदाजांना बांधून ठेवले होते. तसेच ते गडी बाद करण्यात देखील यशस्वी होत होते. आम्हाला या गोष्टीचा अंदाज होता की, या सामन्यातही दव असणार. परंतु गेल्या काही सामन्यांमध्ये आम्हाला जाणवले की, अशा परिस्थितीत गोलंदाजी करणे कठीण नाहीये. दव इतके मोठे फॅक्टर नव्हते. सामना जिंकण्यासाठी आम्हाला चांगले क्रिकेट खेळायची आवश्यकता आहे.”
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १३७ धावा केल्या होत्या. यात रोहित शर्माने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली होती. तसेच ईशान किशनने २६ आणि सूर्यकुमार यादवने २४ धावांचे योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना, दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक ४५ धावांची तुफानी खेळी केली होती. तसेच स्टीव्ह स्मिथने देखील ३३ धावांचे योगदान दिले होतें. शेवटी ललित यादवने नाबाद २२ आणि शिमरन हेटमायरने नाबाद १३ धावा करत हा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाला ६ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
पुन्हा रंगली ‘मांकडिंग’ची चर्चा, लाईव्ह सामन्यात पोलार्डने धवनला दिली चेतावणी; व्हिडिओ व्हायरल
DCvMI: निर्णायक षटकात २ नो बॉल टाकत बुमराह ठरला खलनायक, नावे झाला लाजिरवाणा विक्रम
पराभवानंतर आणखी एक झटका; ‘या’ कारणामुळे मुंबईचा कर्णधार रोहितला तब्बल १२ लाखांचा दंड