भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी करून जगातील महान फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. रोहितच्या नावावर असे अनेक विक्रम आहेत, ज्यांना तोडणं कोणासाठीही सोपे नाही. वनडे सामन्यात ३ द्विशतकं ठोकणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.
रोहित (Rohit Sharma) त्याच्या चाहत्यांना आणि आपली पत्नी रितिका सजदेहला ( Ritika Sajdeh) लकी मानतो. स्टँडमध्ये रितिका बर्याचदा रोहितसाठी प्रार्थना करताना दिसत असते. रितिका आणि रोहित बर्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. पण रोहितच्या अशा दोन सवयी आहेत, ज्यामुळे त्याची पत्नी त्याच्यावर नाराज होते.
भारतीय संघाचा फलंदाज मयंक अगरवालने (Mayank Agrawal) रोहितला एका लाईव्ह सेशन दरम्यान सांगितले, की तुझ्या अशा दोन सवयी आहेत. ज्या रितिकाला अजिबात आवडत नाहीत. मयंक म्हणतो, “रितिकाने सांगितलं, की ज्यावेळी ती तुझ्याशी बोलते, तेव्हा तिला वाटतं की तू तिचं बोलणं ऐकतोय. पण तुझं लक्ष दुसरीकडेच असतं.”
ही गोष्ट ऐकूण भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhavan) म्हणाला, रोहितच डोकं तर बंदच असतं. तरीही रोहितने ही तक्रार खरी असल्याचे सांगत म्हटले, “रितिका मला सांगते, की काय काय सामान संपलं आहे. पण मी म्हणतो मी मागवेल. पण जेव्हा ती संध्याकाळी यावर विचारते, तेव्हा माझ्याकडे कोणतंही उत्तर नसतं. मग मी तिला विचारतो, काय मागवायचे आहे.”
रितिकाला रोहितचं नखं कुरतडण्याची सवयीचाही खूप राग येतो. रोहितने सांगितले, मी यावर बऱ्यापैकी काम करत आहे.
रोहितने या लाईव्ह सेशन दरम्यान सांगितले, “रितिका माझी खूप काळजी करते. काही वर्षांपूर्वी जेव्हा त्याने श्रीलंकेविरुद्ध आपलं तिसरं द्विशतक केलं होतं, तेव्हा रितिका स्टँडमध्ये रडत होती. रितिकाने रोहितला सांगितले, की जेव्हा तो द्विशतकाच्या जवळ होता आणि १९६ धावांनंतर एक धाव घेण्यासाठी उडी मारली, तेव्हा तिला वाटलं त्याचा हात मोडला. त्यामुळे रितिकाचे डोळे भरून आले होते.”