भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा गेल्या काही वर्षांपासून सलग मायदेशात असो किंवा परदेशात असो आपले आणि आपल्या संघाचे नाव गाजवत आहे. रोहितने २०१३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. त्यावेळी पदार्पणाच्या सामन्यातच शतक ठोकत त्याने आपले फलंदाजी कौशल्य दाखवून दिले होते.
दमदार शतकी खेळीसह कसोटीत पदार्पण करणारा रोहित पुढे खराब प्रदर्शनामुळे बराच काळ कसोटी संघातून बाहेर होता. मात्र, २०१७मध्ये भारतीय कसोटी संघात पुनरागमन करत रोहितने परत शतकी खेळीने सुरुवात केली. तरीही त्याला नेहमी कसोटी संघात ये-जा करावे लागत असायचे. त्याने २०१७मध्येच आपले तिसरे कसोटी शतक ठोकले होते. तरीही त्याच्या संघातील स्थानाबाबत मात्र कायमची आशा दिसत नव्हती.
२०१८मध्ये तर रोहितला भारताकडून केवळ २ कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. असे असले तरी, रोहितच्या नावावर एका कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आहे. २०१९मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने हा पराक्रम केला होता. या मालिकेतच त्याने २ शतके आणि एक द्विशतक आपल्या नावावर केले होते. Rohit Sharma Has The World Record Of Hitting Most Sixes In A Test Series
रोहितने दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी मालिकेत १९ षटकार मारत, सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवला होता. त्याच्यापुर्वी हा विश्वविक्रम वेस्ट इंडिजच्या शिमरोन हेटमायरच्या नावावर होता. त्याने २०१८-१९मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत १५ षटकार मारत हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला होता.
याचबरोब रोहितने कसोटी डावात ७ षटकार मारण्याचा कारनामाही केला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
पाकिस्तानचा ‘हा’ माजी क्रिकेटपटू आढळला कोरोना पॉझिटिव्ह; घरामध्येच झाला क्वारंटाईन…
असा पार पडला लाॅकडाऊनमधील भारतात झालेला पहिला क्रिकेट सामना…
जडेजा, विराट नाही तर टीम इंडियातील हा खेळाडू सर्वोत्तम क्षेत्ररक्षक