भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून (१३ फेब्रुवारी) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना चालू आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना तिसऱ्या सत्रापर्यंत २०० पार धावा फलकावर नोंदवल्या आहेत. या दरम्यान भारताचा विस्फोटक फलंदाज रोहित शर्मा याने फटकेबाजी करत धमाकेदार दीडशतकी खेळी केली आहे. यासह एक खास विक्रम त्याच्या नावावर झाला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर भारताने पहिल्या सत्राखेर ३ मोठ्या विकेट्स गमावल्या होत्या. परंतु सलामीला फलंदाजीला आलेल्या रोहितने संघाचा डगमगता डाव सावरला. आक्रमक रवैय्या अंगिकारत चौकार-षटकारांच्या मदतीने अवघ्या ४७ चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले. पुढे आपला आक्रमक फॉर्म कायम राखत त्याने २ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने १३० चेंडूत शतक झळकावले.
यासह रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात ४ वेगवेगळ्या विरोधकांविरुद्ध शतक करण्याचा शानदार विक्रम केला आहे. इंग्लंडव्यतिरिक्त त्याने वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या क्रिकेट संघांविरुद्ध कसोटी, वनडे आणि टी२० मध्ये शतक केले आहे. रोहितला वगळता कोणत्याही फलंदाजाला हा किर्तीमान करता आलेला नाही. इतर फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या या तिन्ही स्वरुपांमध्ये जास्तीत जास्त २ वेगवेगळ्या विरोधी संघाविरुद्ध शतके केली आहेत.
रोहितने शतकानंतर आपली लय काम ठेवत दीडशतकाला गवसणी घातली. अखेर जॅक लीचच्या चेंडूवर मोईन अलीच्या हाती झेल देत रोहित पव्हेलियनला परतला. २३१ चेंडूत त्याने १६१ धावांची मोठी खेळी केली. यात २ षटकार आणि १८ चौकारांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-