भारतीय संघाच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे नुकतीच जबाबदारी देण्यात आली आहे. टी२० विश्वचषकानंतर तो टी२० संघाचा कर्णधार बनलेला. त्यानंतर नुकतेच भारतीय निवड समितीने त्याचे वनडे संघाचा कर्णधार म्हणूनही नाव घोषित केले आहे. या निर्णयावर अनेकांच्या उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. निवड समितीचा हा निर्णय योग्य की अयोग्य अशी चर्चा सुरू असतानाच, रोहित केवळ टी२० कर्णधार केले गेल्याने खुश नव्हता, अशी माहिती समोर येत आहे. (Rohit Sharma Unhappy with T20 captancy)
रोहितला हवे होते वनडे कर्णधारपद
एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा याने सुरुवातीस टी२० संघाचे नेतृत्व स्वीकारण्यास नकार दिला होता. त्याला टी२० सह वनडे संघाचे देखील नेतृत्व हवे होते. त्यामुळे लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी निवड समितीकडे केली होती. त्यामुळेच बीसीसीआय विराट कोहलीने वनडे संघाचे देखील नेतृत्व त्याग करावे, यासाठी प्रयत्नशील होती.
काय म्हणाले गांगुली?
विराट कोहली (Virat Kohli) याला हटवून टी२० सह वनडे संघाचे नेतृत्वही रोहितकडे देण्याविषयी बीसीसीआय देखील सकारात्मक होती. रोहितला वनडे संघाचे कर्णधारपद देऊ केल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले होते की,
“बीसीसीआयने विराटला टी२० आंतरराष्ट्रीय संघाचे कर्णधारपद न सोडण्यासाठी विनंती केली होती. मात्र, त्याने आमचे म्हणणे ऐकले नाही. तेव्हा निवडकर्त्यांना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार ठेवणे योग्य वाटले नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला की, विराट कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहील आणि रोहित मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व करेल.” (BCCI President Sourav Ganguly)
कर्णधार म्हणून रोहितची शानदार कामगिरी
रोहित शर्मा (Rohit Sharma) हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे नेतृत्व करतो. त्याच्या नेतृत्वात मुंबईने पाचवेळा स्पर्धेचे विजेतेपद नावावर केले आहे. याव्यतिरिक्त त्याने अनेकदा विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या टी२० व वनडे संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघाने. निदहास ट्रॉफी (Nidhas Trophy) व २०१८ आशिया चषक ( 2018 Asia Cup) स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. रोहितने भारतासाठी १० वनडे सामन्यात कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यापैकी ८ सामन्यात भारताने विजय मिळवलाय. (New ODI Captain Rohit Sharma)
महत्त्वाच्या बातम्या-
‘मिर्झापूर’च्या ‘कालीन भैय्या’सोबत दिसला एमएस धोनी; भन्नाट नवीन लूकसह ‘माही’चा फोटोही व्हायरल
पहिल्या ऍशेस विजयानंतर ऑस्ट्रेलियाची कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत मोठी झेप; भारताला मात्र नुकसान
असे ४ वर्षांपूर्वी थाटामाटात पार पडले होते विराट-अनुष्काचे लग्न, पाहा खास फोटो अन् व्हिडिओ