भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 12 डिसेंबरला रवाना होणार आहे. या दौऱ्यातील शेवटचे काही सामने सोडून संघाचा कर्णधार विराट कोहली खासगी कारणासाठी मायदेशी परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत कसोटी सामन्यासाठी अजिंक्य रहाणे ऐवजी रोहित शर्माला कर्णधार करावे, असा पर्याय व मत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलिया दौरा हा दोन महिन्यांपेक्षा जास्त मोठा दौरा आहे. या दौऱ्यावर सुरुवातीला वनडे मालिका, त्यानंतर टी-20 मालिका व शेवटी कसोटी मालिका होणार आहे. कसोटी मालिकेतील शेवटचे तीन सामने विराट कोहली खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत उपकर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेला कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करावे लागणार आहे. त्याऐवजी रोहित शर्मा हा एक अनुभवी कर्णधार आहे, असेही इरफान पठाण म्हणाला आहे.
आयपीएल स्पर्धेत रोहित शर्माने कर्णधार म्हणून 4 वेळा आपल्या मुंबई इंडियन्स संघाला जेतेपद मिळवून दिले आहे. रहाणे चांगला खेळाडू आहे व ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघासमोर कर्णधार म्हणून त्याला पुढे करणे, पठाण योग्य मानत नाही.
तो म्हणाला की, “सलामी फलंदाज म्हणून रोहित शर्माची भूमिका महत्त्वाची आहे. तो असा खेळाडू आहे ज्याला तुम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेलेच पाहिजे. 2008 मध्ये नवीन असतानाही त्याने ऑस्ट्रेलियामध्ये जबरदस्त प्रदर्शन केले होते. विदेशी जमिनीवर खेळणे सोपे नाही. पण रोहित जर फॉर्ममध्ये असेल, तर त्याच्यासाठी काहीच कठीण नसेल. सलामी फलंदाज म्हणून तो त्याची भूमिका योग्य निभावेल.”
“तिसऱ्या स्थानी चेतेश्वर पुजारा अजूनही योग्य आहे. तो ऑस्ट्रेलियात झालेल्या मागील मालिकेत मालिकावीर ठरला होता, तर फलंदाजी क्रमात चौथ्या स्थानी विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे योग्य ठरेल,” असेही इरफान पुढे म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2020 FINAL : मुंबई पाचव्यांदा ट्रॉफी जिंकणार का दिल्ली पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न साकारणार?
हैदराबादच्या पराभवानंतर विलियम्सन भावुक; म्हणाला, ‘फायनलमध्ये न पोहोचणे…’
ट्रेंडिंग लेख-
मुंबईसाठी आयपीएल जिंकलेला ‘तो’ आज मुंबईला हरवण्यासाठी उतरणार मैदानात
एकाच षटकात आयपीएलचा इतिहास बदलणारा ‘एन्रीच नॉर्किए’
मुंबईवर भारी पडणार दिल्लीचा संघ; ‘हे’ चार खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये