इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये मंगळवारी (10 नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने उत्कृष्ट फलंदाजी केली. एवढेच नव्हे, तर त्याने एक खास विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
दिल्लीने केल्या 156 धावा
या महत्वपूर्ण सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्ताखालील दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर मार्कस स्टॉइनिस तंबूत परतला. अनुभवी फलंदाज अजिंक्य राहणे (2 धावा) आणि शिखर धवन (15 धावा) यांनाही काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानंतर श्रेयस अय्यर (65 धावा) आणि रिषभ पंत (56 धावा) यांनी 96 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.त्यांच्या या खेळीच्या जोरावर दिल्लीला 20 षटकांत 156 धावा करता आल्या.
रोहितने केल्या 67 धावा
प्रत्युत्तरादाखल मुंबईने चांगली सुरवात केली.रोहितने पहिल्याच षटकात षटकार ठोकत आम्ही जिंकण्याचा निश्चयानेच मैदानात उतरलो हे स्पष्ट केले. त्याने त्याची आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली आणि 47 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या.
…अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
हे रोहितच्या आयपीएल कारकिर्दीतील अंतिम सामान्यातले दुसरे अर्धशतक होते. अंतिम सामन्यात त्याने दोन वेळा 50 पेक्षा अधिक धावा करत विक्रम नोंदवला आहे. अंतिम सामन्यात 2 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारा तो पहिलाच कर्णधार ठरला आहे. तर एकूण चौथा खेळाडू ठरला. याआधी सुरेश रैना, माईक हसी आणि शेन वॉटसनने अशी कामगिरी केली आहे.
अंतिम सामन्यात सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारे खेळाडू :
रोहित शर्मा – 2 वेळा
सुरेश रैना – 2 वेळा
माईक हसी – 2 वेळा
शेन वॉटसन – 2 वेळा
महत्त्वाच्या बातम्या –
हारले म्हणून काय झालं, दिल्लीचा आयपीएलमधील प्रवास मात्र राहिलाय रोमांचक
अरर! अंतिम सामन्यात रोहितवर ओढवली बदली खेळाडूच्या हातून बाद होण्याची नामुष्की